Manoj Jarange Patil : राज्यातील राजकारणाला वेगळं वळण! मनोज जरांगे पाटील घेणार मोठी भूमिका, अनेकांचे टेंशन वाढले…

Manoj Jarange Patil : राज्याच्या राजकारणात अनेक घडताना दिसत आहेत. तसेच लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना अशातच आगामी लोकसभा निवडणुकांना वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. कारण अंतरवाली सराटीमध्ये घडामोडींना वेग आला आहे.
काल मध्यरात्री अचानक वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. यादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये एक तासभर चर्चा झाली. यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.
भेटीदरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली आहे, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली. पण वंचित बहुजन आघाडी आणि मनोज जरांगे पाटील हे एकत्र निवडणूक लढणार का? यावर आंबेडकर यांनी योग्य वेळ आली की सांगू असं म्हटलं आहे.
समाज जर म्हणाला तर इतक्या ताकदीनं राजकारणात उतरणार, त्यावेळी मला हलक्यात घेऊ नका. येत्या तीस तारखेला आपण आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. Manoj Jarange Patil
त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. पण जरांगे पाटील आणि आंबेडकर यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, यावेळी बराच वेळ दोघांमध्ये लोकसभेच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली. त्यानंतर जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की गावागावात बैठका घ्यायला सांगितल्या आहेत. त्यानंतर तो अहवाल माझ्याकडे येईल, जर समाज म्हणाला तर इतक्या ताकदीनं राजकारणात उतरणार मग मला जसं आंदोलनात हलक्यात घेतलं तसं राजकारणात घ्यायचे नाही असे जरांगे पाटील म्हंटले आहे.