Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांना पुणे न्यायालयाचा धक्का, अटक वॉरंट जारी, राज्यातील मराठा समाज आक्रमक…


Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे यांनी ५ व्या दिवशी आपले उपोषण मागे घेतले आहे. मात्र त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्या प्रकरणी पुणे न्यायालयाने मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे.

पुण्यातील एका नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्या प्रकरणी मनोज जरांगे- पाटील यांच्यासह अन्य दोघांविरोधात पुण्यातील कोथरुड न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी न्यायालयातील सुनावणीला गैरहजर राहिल्यानं मनोज जरांगे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. २०१३ मध्ये मनोज जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एका नाट्य प्रयोगाचे आयोजन केले होते. त्या नाट्य प्रयोगाची ठरलेली रक्कम न दिल्याचा आरोप नाट्यनिर्मात्यानं केला होता.

या प्रकरणी जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर यांच्याविरोधात फसवणूक केल्याची तक्रार कोथरूड पोलिसात २०१३ मध्ये दाखल करण्यात आलीत्यानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर जरांगे यांच्या पुणे सत्र न्यायालयामध्ये खटला चालू होता. या दरम्यान झालेल्या सुनावणीला मनोज जरांगे पाटील हजर राहिले नाहीत. Manoj Jarange Patil

त्यामुळे न्यायालयाने जरांगे पाटील यांना दोनदा समन्स बजावला होता. मनोज जरांगे पाटील यांच्यावर नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप केलेला आहे. या प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या सुनावणीला जरांगे हजर राहिले नसल्यामुळे त्यांच्याविरोधात पुणे न्यायालयाने अटक वॉरंट काढले आहे.

त्यामुळेच पुन्हा राज्यातील वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. जरांगे पाटील हे सध्या अंतरवाली सराटीत उपोषणाला बसले आहेत. आता ते न्यायालयाच्या आदेशाला ते काय उत्तर देणार, याकडे राज्याचे लक्ष आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!