Manoj Jarange Patil : भाजपचा मोठा मंत्री रात्री अचानक अंतरवालीत, जरांगेंसोबत गुप्त बैठक, राजकारणात खळबळ…

Manoj Jarange Patil : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत याबद्दलची मोठी घोषणा केली आहे.
अशातच आता राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय समीकरणेही तयार होऊ लागली आहे. महायुती सरकारने मराठा आरक्षणाबाबत कोणतीही ठोस पावले न उचलल्याने मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला.
मनोज जरांगे यांनी या विधानसभा निवडणुकीत समाजाच्या भवितव्याला लक्षात घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले. जरांगे यांनी सरकारवर टीकाही केली होती. त्यानंतर मध्यरात्री उशिरा भाजपच्या महत्त्वाच्या नेत्याने जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटीमध्ये भेट घेतली. या भेटीनंतर चर्चांना उधाण आले आहे. Manoj Jarange Patil
भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची मध्यरात्रीनंतर भेट घेतली. आचारसंहिता लागताच मराठवाड्यात हालचालिंना वेग आला आहे. त्यामुळे विखे हे मध्यरात्री अंतरवाली सराटीत दाखल झाले.
जरांगे यांच्यासोबत विखेंनी चर्चा केली आहे. या दोघांमध्ये विधानसभा निवडणुकीवर चर्चा झाल्याची शक्यता आहे. मात्र, आता जरांगे काय भूमिका जाहीर करतात हे पाहणं महत्वाचे असणार आहे.