मनोज जरांगे पुन्हा मैदानात! मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, शिंदे समितीला मुदतवाढ, उपोषण सुरू…


मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने लोकांनी हजेरी लावली होती.

यावेळी जरांगे म्हणाले की, मराठा समाजाच्या १० मागण्या आम्ही सरकारपुढे ठेवलेल्या आहेत. सरकारने अध्यादेश काढून त्वरीत त्याची अंमलबजवाणी करून मराठा समाजाचे दु:ख हलके करावे, असे जरांगे म्हणाले.

तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्याही बळी प्रकरणात आपल्याला न्याय देण्याच्या भूमिकेसाठी सरकारविरोधात लढायचे असल्याचे जरांगे यांनी सांगितले आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायासाठी मुंबईत आक्रोश मोर्चा होत असताना जालन्याच्या अंबडमधील आंतरवाली सराटीमध्ये विक्रमी आठव्यांदा आमरण उपोषणाला जरांगे यांनी सुरुवात केली.

याआधी माझी तब्येत बिघडल्यावर लोक गर्दी करायचे पण यावेळी उपोषणाच्या पहिल्याच दिवशी मंडप गर्दीने फुलून गेला आहे. तुम्ही उपोषणाला बसला नाहीत तरी चालेल, फक्त मला आशीर्वाद द्या, असे जरांगे म्हणाले आहे.

मराठा आरक्षण-मनोज जरांगे यांच्या राज्य सरकारकडे १० मागण्या..

आरक्षणाच्या मागणीकरता २५ जानेवारीपासून उपोषण सुरू झाले आहे. सगेसोयरे कायदा अंमलबजावणीसाठी जवळपास एक वर्ष लागलं. एक वर्षापासून समाज रस्त्यावर आहे. आजही मराठे त्याच ताकदीने उभे आहेत. आमच्या त्रासाची जाण सरकारला नाही. सरसकट कुणबी प्रमाण द्या.

सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी तातडीने लागू करा. कुणबी नोंदीच्या आधारावर त्यांना आरक्षण द्यावे, सगळ्या सगे सोयऱ्यांचा व्यवसाय एकच आहे त्यामुळे मागेपुढे न पाहता कुणबी दाखले दिले जावेत, न्यायमुर्ती संपत शिंदे समितीला तातडीने मुदतवाढ द्या.

दाखल्यांसाठी विशेष कक्ष पुन्हा सुरु करा, आंदोलकरांवरील गुन्हे मागे घ्या, सातारा-औंध-मुंबई-हैद्राबाद गॅझेट लागू करा तसेच आत्महत्या केलेल्या बांधवांच्या कुटुंबाला निधी आणि शासकीय नोकरी द्या, अशा १० मागण्या जरांगे यांनी राज्य शासनाकडे केल्या.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!