Manchar News : ती आई होती म्हणून पोटच्या लेकरासाठी केले बिबट्याशी दोन हात, अन् बिबट्याच्या तोंडातून वाचवला पोटचा गोळा..


Manchar News : आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही’, असे कायमच म्हटले जाते आणि ते खरदेखील आहे. कारण, एक आई आपल्या मुलांसाठी कायम अनेक गोष्टींचा त्याग आणि तडजोड करत असते. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे.

आईने आपल्या जीवाची परवा न करता बिबट्याच्या हल्ल्यातून जोरदार प्रतिकार करत पोटच्या गोळ्याला वाचविले असल्याची घटना आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथील फुटाणे मळा येथे घडली आहे. Manchar News

मेंढपाळाच्या आठ महिन्याच्या मुलावर रात्री दोनच्या सुमारास बिबट्याने हल्ला केल्याची घटना आज पहाटे घडली आहे. आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथील फुटाणे मळ्यातील ही घटना राज्यात चर्चेची ठरली. Manchar News

थोरांदळे (ता. आंबेगाव) येथील फुटाणे मळा येथे सुखदेव फुटाणे यांच्या शेतात धोंडीभाउ करगळ या मेंढपाळाचा वाडा बसलेला होता. मेंढपाळ धोंडीभाऊ करगळ यांची पत्नी सोनल करगळ ही तिच्या आठ महिन्याच्या मुलागा देवा याला घेऊन वाड्याचे शेजारीच बाहेर झोपली होती. रात्री दोन वाजता सुमारास ती बाहेर झोपले असताना मुलाचा हात अंथुरणाचे बाहेर होता.

दरम्यान, त्यावेळी बाजूलाच दबा धरून बसलेल्या बिबट्याने मुलाचा हात तोंडात धरत ओढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सोनल करगळ यांना जागा आली असता तिने मुलाला ओढत बिबट्याला प्रतिकार सुरू केला. तिने एका हाताने बिबट्याचे तोंड दाबण्याचा प्रयत्न करत एका हाताने मुलाला वाचवण्यासाठी धडपड सुरू केली. नंतर जोर जोरात आरडा ओरडा केला.

त्यावेळी तिच्या कुटुंबातील सदस्य बाहेर येत त्यांनी जोर जोरात आरडाओरडा केला त्यावेळी बिबट्या पळून गेला. या हल्ल्यात आठ महिन्याचा मुलगा देवा धोंडीभाऊ करगळ याच्या हाताला दात लागला असून पोटाला नख्या लागल्या आहेत. मात्र बिबट्याच्या तावडीतून बाळाला सोडविणाऱ्या या मर्दुमकीची चर्चा सगळीकडे सुरु आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!