माळेगाव सहकारी साखर कारखाना अंतिम सभासद मतदार यादी प्रसिद्ध!! कार्यक्षेत्रात वाहू लागलं निवडणुकीचे वारे, भेटीगाठी वाढल्या…

बारामती : येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५ – २०३० ची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. यामुळे येणाऱ्या काळात निवडणूक होणार आहे. यामुळे इच्छुकांनी तयारी सुरू केली असून गाठीभेटी सुरू आहेत. कारखान्याची एकूण ६ गटांतून (‘अ’ वर्ग) १९ हजार ५४९, तर ‘ब’ वर्गातून १०२ सभासद आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
कारखाना कार्यक्षेत्रातील गट, गटामधील गावे व मतदार पुढीलप्रमाणे, यामध्ये कारखाना कार्यक्षेत्रातील गट क्रमांक ३ : सांगवी (२४८७) गावे: सांगवी (१३३६), कांबळेश्वर (७००) (शिरष्णे) (२८२), पांढरेवाडी (११९), पिंगळेवाडी (५०). गट क्रमांक ४ : खांडज-शिरवली (२३७९) गावे : खांडज (१४७७), शिरवली (९०२).
तसेच गट क्रमांक ५: निरावागज (३५०६) गावे : निरावागज (१८५३), मेखळी (१२७३), सोनगाव (२४१), घाडगेवाडी (१३९). गट क्रमांक ६ : बारामती (४४१६) गावे बारामती (७०३), मळद (६९१), मेडद (६०५), गुणवडी (४४७), डोर्लेवाडी (२३३), राजाळे-सांगवी (१), वीरपुरी-दहिगाव (१), कऱ्हावागज (५६१), नेपतवळण (२८८), बऱ्हाणपूर (१२०), उंडवडी सुपे (१८२), उंडवडी क. प. (१४७), जराडवाडी (२८६), सोनवडी (१५१)
माळेगाव (२९६५) गावे : माळेगाव बुद्रुक (१७६७), माळेगाव खुर्द (५८०), येळेगाव (१९४), पाहुणेवाडी (१४०), ढाकाळे (२८४). गट क्रमांक २ पणदरे (३७९६) गावे : पणदरे (२२८६), मानाप्पाचीवाडी (२७८), पवईमाळ (२१५), सोनकसवाडी (३५१), कुरणेवाडी (१४९), धुमाळवाडी (२८८), खामगळवाडी (२२९). अशी संख्या असणार आहे.
यामुळे येणाऱ्या काळात निवडणुकीची अंतिम तारीख देखील जाहीर होईल. जवळच असलेल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक देखील अनेक वर्षे लांबली आहे. यामुळे याठिकाणी देखील कधी निवडणूक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.