अभिजीत दिपके यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट! अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने डॉक्टरांचे पथक घरी दाखल

छत्रपती संभाजीनगर : कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, त्यांना अचानक शारीरिक अस्वस्थता जाणवू लागल्यानंतर घरीच वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे पथक लक्ष ठेवून असल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत दिपके यांना अचानक मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर अशक्तपणा जाणवल्याने कुटुंबीयांनी आणि सहकाऱ्यांनी तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधला.

यानंतर डॉक्टरांचे पथक त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले असून, त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. आवश्यक वैद्यकीय तपासण्या आणि उपचार करण्यात येत असून, त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.


दरम्यान, त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत वैद्यकीय बुलेटिन अद्याप जारी करण्यात आलेले नाही. डॉक्टरांच्या पुढील तपासणीनंतर त्यांच्या प्रकृतीविषयी अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.