मोठी बातमी! राजधानी दिल्लीत मोठा दहशतवादी कट उधळला; ISIशी संबंधित चौघांना अटक


नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत मोठा दहशतवादी कट उधळण्यात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला यश आले आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISIशी संबंधित असल्याचा संशय असलेल्या चार जणांना अटक करण्यात आली असून, त्यापैकी तिघांना पंजाबमधून तर एकाला दिल्लीतून ताब्यात घेण्यात आले आहे.

प्राथमिक तपासात, ISIचा हँडलर शहजाद भट्टी याच्या सूचनेनुसार आरोपी संभाव्य दहशतवादी कारवाईची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली किंवा दिल्ली-एनसीआर परिसरात मोठा हल्ला घडवून आणण्याचा कट रचला जात असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

स्पेशल सेलने वेळेत कारवाई करत हा कट उधळून लावला. अटक करण्यात आलेले चारही आरोपी तिशीच्या आतील वयोगटातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आरोपींकडून पिस्तूल, रायफल तसेच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून, या शस्त्रसाठ्याच्या आधारे तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.

सध्या आरोपींची कसून चौकशी सुरू असून, त्यांचे पाकिस्तानस्थित हँडलर्सशी आणखी कोणते संबंध आहेत, या कटात इतर कोणी सहभागी आहे का, तसेच या कारवाईमागील नेमका उद्देश काय होता, याचा तपास दिल्ली पोलिसांकडून सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!