पुण्यातील लग्नसोहळ्यात मोठा धक्का! पाहुण्यांच्या गर्दीत शिरलेल्या तीन महिलांनी नवरीच्या खोलीत घडवलं मोठं कांड…


पुणे : वाघोलीतील एका प्रसिद्ध बँक्वेट हॉलमध्ये पार पडलेल्या लग्नसोहळ्यात धक्कादायक चोरीची घटना समोर आली आहे. लग्नाच्या गडबडीत पाहुण्यांमध्ये मिसळून आलेल्या महिलांनी थेट नवरीच्या खोलीत शिरत सव्वा लाखांचे दागिने लंपास केल्याने लग्नघरात एकच खळबळ उडाली.

१४ मे रोजी वाघोली येथील ‘श्रेयस बँक्वेट हॉल’मध्ये हा प्रकार घडला. लग्नसोहळा सुरू असताना नवरी मेकअप रूममध्ये तयारी करत होती. अक्षता पडल्यानंतर विवाह सोहळा थाटामाटात पार पडला. मात्र, नंतर वधू आपल्या खोलीत परतली असता पर्समधील दागिने गायब असल्याचं तिच्या लक्षात आलं आणि एकच गोंधळ उडाला.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन अल्पवयीन मुलींसह तीन संशयित महिला पाहुण्यांच्या गर्दीत मिसळून थेट वधूच्या खोलीपर्यंत पोहोचल्या. लग्नाच्या गडबडीचा फायदा घेत त्यांनी खोलीत प्रवेश केला आणि पर्समधील सव्वा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून पसार झाल्या. लग्नकार्य आटोपल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर वधूपक्षाला मोठा धक्का बसला. याप्रकरणी केसनंद येथील एका ३० वर्षीय व्यक्तीने वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलीसांनी दोन अल्पवयीन मुलींसह तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ‘लेडीज गँग’चा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे लग्नसमारंभात मौल्यवान वस्तूंची सुरक्षितता किती महत्त्वाची आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!