धनत्रयोदशीला सोन्या-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे भाव


पुणे : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना महागाईचा फटका बसत आहे. सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ नोंदवण्यात आली असून सराफा बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन कडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम तब्बल 2,507 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचा भाव 1 लाख 44 हजार रुपयांच्या पुढे गेला आहे.

यापूर्वी 4 नोव्हेंबर रोजी सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1 लाख 42 हजार रुपये होता. दुसरीकडे, चांदीच्या किमतीतही वाढ झाली असून प्रतिकिलो दरात 1,167 रुपयांची भर पडली आहे. त्यामुळे चांदीचा भाव आता 1 लाख 87 हजार रुपयांवर पोहोचला आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोने-चांदीच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. 2 नोव्हेंबर रोजी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1 लाख 38 हजार रुपये, तर एक किलो चांदीचा दर 1 लाख 80 हजार रुपये होता. त्यानंतर आतापर्यंत सोन्याच्या दरात सुमारे 6,605 रुपये आणि चांदीच्या दरात 7,328 रुपयांची वाढ झाली आहे.

या वर्षात सोन्याच्या दरात किती वाढ?
2026 च्या सुरुवातीपासून सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. 31 डिसेंबर 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1 लाख 33 हजार रुपये होता. आता हाच दर वाढून 1 लाख 44 हजार रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच वर्षाच्या सुरुवातीपासून सोन्याच्या किमतीत जवळपास 11 हजार रुपयांची वाढ झाली आहे.

मात्र, चांदीच्या बाबतीत वेगळे चित्र दिसत आहे. 31 डिसेंबर 2025 रोजी प्रतिकिलो 2 लाख 30 हजार रुपये असलेली चांदी आता 1 लाख 87 हजार रुपयांवर आली आहे. त्यामुळे या कालावधीत चांदीच्या दरात तब्बल 43,120 रुपयांची घसरण झाली आहे.

दरम्यान, याच वर्षी 29 जानेवारी रोजी सोन्याने प्रति 10 ग्रॅम 1 लाख 76 हजार रुपये, तर चांदीने प्रतिकिलो 3 लाख 86 हजार रुपयांचा ऐतिहासिक उच्चांक गाठला होता.

आजचा सोन्याचा भाव किती?

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार, शुक्रवार, 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,44,129 रुपये नोंदवण्यात आला आहे. विविध कॅरेटमधील सोन्याचे दर पुढीलप्रमाणे आहेत.

कॅरेटप्रमाणे सोन्याचे दर
आज 24 कॅरेट सोन्याचा दर 1,44,129 रुपये, 22 कॅरेटचा दर 1,43,552 रुपये, 20 कॅरेटचा दर 1,32,022 रुपये, 18 कॅरेटचा दर 1,08,097 रुपये, तर 14 कॅरेट सोन्याचा दर 84,315 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे.

महाराष्ट्रातील शहरांमधील सोन्याचे दर
मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पुणे, नागपूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, सांगली आणि बारामती या सर्व शहरांमध्ये सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,44,129 रुपये नोंदवण्यात आला आहे.

आजचा चांदीचा भाव किती?
सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, शुक्रवार, 6 नोव्हेंबर रोजी चांदीचा भाव प्रतिकिलो 1,87,300 रुपये इतका नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे धनत्रयोदशीच्या काळात सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना वाढलेल्या दरांचा विचार करूनच खरेदीचे नियोजन करावे लागणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!