मोठी घसरण! सोने-चांदीच्या दरात मोठा उलटफेर; वाचा आजचे लेटेस्ट रेट


पुणे : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. आणि गेल्या आठवडाभरात त्यात झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे. सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे.

आज शुक्रवार, २६ जून २०२६ रोजी सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत पुन्हा एकदा मोठी घसरण पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारपेठेतील विक्रीचा सपाटा आणि व्याजदरांबाबत अमेरिकन फेडरल रिझर्व्हने (घेतलेली कडक भूमिका यामुळे गेल्या २-३ दिवसांपासून बाजारावर कमालीचा दबाव आहे. याचा थेट परिणाम मौल्यवान धातूंच्या दरांवर झाला असून किमती सातत्याने खाली येत आहेत.

सोने-चांदीचे आजचे ताजे दर

सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम):

२४ कॅरेट सोने: आज २४ कॅरेट सोन्याचा भाव कालच्या (२५ जून) तुलनेत प्रति १० ग्रॅम ९४० रुपयांनी घसरला आहे. काल याची किंमत १,४१,०७० रुपये होती, ती आज घटून १,४०,१३० रुपयांवर आली आहे.

२२ कॅरेट सोने: २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ८६० रुपयांची घसरण झाली आहे. काल १,२९,२२० रुपयांवर असलेले सोन्याचे भाव आज १,२८,३६० रुपयांवर आले आहेत.

चांदीचे भाव (प्रति किलो):

चांदीच्या किमतीत काल (२५ जून) प्रति किलो तब्बल १०,००० रुपयांची मोठी घसरण झाली होती. त्या तुलनेत आज चांदीच्या भावात प्रति किलो १०० रुपयांची किरकोळ घसरण दिसत आहे. काल चांदीचा दर प्रति किलो २,३५,००० रुपये होता, तो आज २,३४,९०० रुपये प्रति किलो एवढा आहे.

भविष्यात पुन्हा भाव वाढणार का?

जागतिक ब्रोकरेज फर्म UBS ने वर्तवलेल्या अंदाजानुसार, सोने आणि चांदीच्या किमतीतील ही घसरण तात्पुरती आहे. जानेवारी २०२६ मधील आपल्या सर्वोच्च पातळीवरून सोने आतापर्यंत २८% टक्क्यांनी घसरले आहे.

परंतु, या वर्षाच्या अखेरीस आंतरराष्ट्रीय बाजारात सोने ५,५०० डॉलर प्रति औंस पर्यंत झेप घेऊ शकते. म्हणजेच, पुढील सहा महिन्यांत सोन्याचे दर सध्याच्या पातळीवरून तब्बल ३६% टक्क्यांनी वाढू शकतात, त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ही एक चांगली संधी ठरू शकते.

घसरण का झाली?

डॉलर मजबूत झाला
जागतिक बाजारात दबाव
गुंतवणूकदारांनी नफा काढला
US Fed च्या व्याजदरांबाबत अनिश्चितता
सुरक्षित गुंतवणुकीकडे मागणी कमी झाली

पुढे काय होऊ शकतं?

तज्ज्ञांच्या मते ही घसरण तात्पुरती आहे. पुढे दर पुन्हा वाढू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!