केंद्र सरकारचा मोठा निर्णय! PM किसान योजनेत काही शेतकऱ्यांचा हप्ता थांबणार; तुमचं नाव आहे का? लगेच तपासा

नवी दिल्ली : देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 22 हप्ते जमा झाले असून आता सर्वांचे लक्ष 23 व्या हप्त्याकडे लागले आहे. मात्र, या वेळी काही शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही, अशी माहिती समोर आली आहे.
केंद्र सरकारने योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी प्रक्रिया अधिक कठोर केली असून पात्र शेतकऱ्यांनाच लाभ मिळावा यासाठी नियम कडक करण्यात आले आहेत. बनावट कागदपत्रे, चुकीची माहिती किंवा अपूर्ण नोंदी असलेल्या लाभार्थ्यांना पुढील हप्ता रोखला जाऊ शकतो.

23 वा हप्ता जून ते जुलैदरम्यान जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही सरकारच्या नव्या नियमांनुसार, ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना 23 व्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही. तसेच जमिनीची पडताळणी आणि आधार-बँक खाते लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

सरकारने स्पष्ट केले आहे की, या योजनेचा उद्देश फक्त पात्र आणि गरजू शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवणे हा आहे. त्यामुळे अपात्र किंवा अपूर्ण माहिती असलेल्या लाभार्थ्यांना योजनेतून वगळले जाणार आहे.