अधिवेशन काळात फडणवीसांचा मोठा निर्णय! राज्यातील 115 DYSP दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य सरकारने पोलीस उपअधीक्षक (DYSP) आणि समकक्ष दर्जाच्या तब्बल 115 अधिकाऱ्यांच्या बदल्या व पदस्थापनेचे आदेश जारी केले आहेत. गृह विभागाने सोमवारी काढलेल्या आदेशानुसार राज्यातील विविध जिल्हे, पोलीस आयुक्तालये, सीआयडी, एटीएस, गुप्तवार्ता विभाग तसेच इतर महत्त्वाच्या शाखांमधील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बदल्यांना मंजुरी दिली. काही अधिकाऱ्यांना नव्या ठिकाणी पदस्थापना देण्यात आली असून काही अधिकाऱ्यांना विद्यमान पदावरच मुदतवाढ देण्यात आली आहे.
या बदल्यांमध्ये नांदेड येथील नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलीस उपअधीक्षक जितेंद्र पोपटराव जाधव यांची जालना पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली करण्यात आली आहे. तर नागपूर शहरातील सहायक पोलीस आयुक्त डॉ. अभिजित शिवाजीराव पाटील यांची नांदेड येथे नागरी हक्क संरक्षण विभागात नियुक्ती करण्यात आली आहे.

पालघरच्या बोईसर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विकास संपत नाईक यांची नागपूर येथे नागरी हक्क संरक्षण विभागात बदली करण्यात आली आहे. नागपूर ग्रामीणच्या रामटेक उपविभागातील उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सुदाम बरकते यांची भंडारा जिल्ह्यातील पवनी उपविभागात बदली करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवडचे सहायक पोलीस आयुक्त सचिन प्रकाश हिरे यांची पुणे शहरात नियुक्ती झाली आहे. नाशिक येथील एटीएसचे अपर पोलीस अधीक्षक माधव ज्ञानोबा रेड्डी यांची नाशिक शहरात सहायक पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.
ठाणे शहरातील सहायक पोलीस आयुक्त अमोल विलास कोळी यांची यवतमाळ उपविभागात पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. मीरा-भाईंदर वसई-विरार येथील सहायक पोलीस आयुक्त उमेश शंकर माने (पाटील) यांची सांगली येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीत पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे शहरातील सहायक पोलीस आयुक्त मंदार मल्लिकार्जुन जावळे यांची परिवहन विभागाच्या दक्षता शाखेत बदली झाली आहे.
पिंपरी-चिंचवडचे सहायक पोलीस आयुक्त विशाल शामराव हिरे यांची नवी मुंबईत नियुक्ती करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड उपविभागाचे अधिकारी दिनेशकुमार माधवराव कोल्हे यांची सीआयडी, छत्रपती संभाजीनगर येथे अपर पोलीस अधीक्षक (एटीएस) पदावर बदली करण्यात आली आहे. सातारा शहर उपविभागाचे अधिकारी राजीव धुराजी नवले यांची पुणे सीआयडीमध्ये पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.
नाशिक ग्रामीणमधील कळवण उपविभागाचे अधिकारी किरणकुमार चंद्रकांत सूर्यवंशी यांची राज्य गुप्तवार्ता विभागाच्या कोकण घटकात अपर उपआयुक्त (एटीएस) म्हणून बदली करण्यात आली आहे. नागपूर ग्रामीणच्या कामठी उपविभागातील अधिकारी संतोष बाबुराव गायकवाड यांची पिंपरी-चिंचवड येथे सहायक पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. सोलापूर ग्रामीणमधील अक्कलकोट उपविभागाचे अधिकारी विलास विठ्ठल यामावार यांची पुणे सीआयडीमध्ये बदली करण्यात आली आहे.
मीरा-भाईंदर वसई-विरारचे सहायक पोलीस आयुक्त बजरंग बहादुरराव देसाई यांची नवी मुंबईत बदली झाली आहे. पुणे शहरातील सहायक पोलीस आयुक्त नंदिनी अमित वग्यानी (नंदा राजेंद्र पराजे) यांची पुणे अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्समध्ये पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दौंड येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील सई प्रताप भोरे-पाटील यांची पुणे येथील अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समितीत बदली करण्यात आली आहे.
पुणे ग्रामीणच्या शिरूर उपविभागाचे अधिकारी प्रशांत बाबासो ढोले यांची पिंपरी-चिंचवड येथे सहायक पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गडचिरोलीतील घोट उपविभागाचे अधिकारी जगदीश रामराव पांडे यांची अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली झाली आहे. ठाणे ग्रामीणच्या शहापूर उपविभागातील अधिकारी मिलिंद देवराम शिंदे यांची ठाणे शहरात सहायक पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पूनम संभाजी पाटील यांची नाशिक शहरात सहायक पोलीस आयुक्त म्हणून बदली झाली आहे. धाराशिवच्या तुळजापूर उपविभागाचे अधिकारी निलेश विश्वासराव देशमुख आणि ठाणे शहरातील प्रिया देविदास डमाळे यांची पिंपरी-चिंचवड येथे नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे सीआयडीमधील अपर पोलीस अधीक्षक तृप्ती अर्जुन जाधव यांची धाराशिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीत बदली झाली आहे.
नांदेडच्या देगलूर उपविभागाचे अधिकारी संकेत सतीश गोसावी यांची पुणे सीआयडीमध्ये बदली करण्यात आली आहे. सांगलीच्या मिरज उपविभागाचे अधिकारी प्रणिल प्रफुल्ल गिल्डा यांची कोल्हापूरच्या शाहूवाडी उपविभागात नियुक्ती करण्यात आली आहे. कोल्हापूरच्या करवीर उपविभागातील सुजीतकुमार आण्णा क्षीरसागर यांची अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत उपविभागात बदली करण्यात आली आहे.
पुणे ग्रामीणच्या बारामती उपविभागाचे अधिकारी सुदर्शन साईदास राठोड यांची पिंपरी-चिंचवड येथे नियुक्ती झाली आहे. सोलापूर ग्रामीणचे अधिकारी संकेत नथुराम देवळेकर यांची परभणी शहर उपविभागात बदली करण्यात आली आहे. गोंदियातील तिरोडा उपविभागाचे अधिकारी साहील उमाकांत झरकर यांची चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी उपविभागात नियुक्ती करण्यात आली आहे.
गोंदियाच्या आमगाव उपविभागाचे अधिकारी प्रमोद मयाराम मडामे यांची नागपूर ग्रामीणच्या कामठी उपविभागात बदली करण्यात आली आहे. गडचिरोलीच्या एटापल्ली उपविभागाचे अधिकारी चैतन्य वसंतराव कदम यांची बारामती उपविभागात नियुक्ती करण्यात आली आहे. सांगलीच्या विटा उपविभागाचे अधिकारी विपुल विजय पाटील यांची बुलढाणा उपविभागात बदली करण्यात आली आहे.
गडचिरोलीच्या कुरखेडा उपविभागाचे अधिकारी रविंद्र दिनकर भोसले यांची शिरूर उपविभाग, पुणे येथे बदली करण्यात आली आहे. परभणीतील पूर्णा उपविभागाचे अधिकारी समाधान माधवराव पाटील यांची गडचिरोलीच्या सिरोंचा उपविभागात नियुक्ती झाली आहे. गोंदियाच्या देवरी उपविभागाचे अधिकारी विवेक हरिदास पाटील यांची कोल्हापूरच्या गडहिंग्लज उपविभागात बदली करण्यात आली आहे.
गडचिरोली मुख्यालयातील पोलीस उपअधीक्षक योगेश चंद्रकांत रांजणकर, गोंदियाच्या रोहिणी ज्ञानदेव बाणकर आणि बुलढाण्यातील मनीषा विश्वंभर कदम यांची पिंपरी-चिंचवड येथे सहायक पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय गडचिरोलीच्या अहेरी उपविभागाचे अधिकारी अजय विलास कोकाटे यांची नवी मुंबईत बदली झाली आहे. अहेरी मुख्यालयातील विशाल अर्जुन नागरगोजे यांची ठाणे ग्रामीणच्या शहापूर उपविभागात नियुक्ती करण्यात आली आहे. गडचिरोलीच्या सिरोंचा उपविभागातील संदेश तारसिंग नाईक यांची सांगलीच्या मिरज उपविभागात बदली करण्यात आली आहे.
यवतमाळ उपविभागातील दिनेश किसन बैसाने यांची पालघरच्या बोईसर उपविभागात नियुक्ती झाली आहे. गडचिरोली उपविभागातील सूरज विठ्ठल जगताप यांची सोलापूर ग्रामीणमध्ये बदली करण्यात आली आहे. पालघरच्या डहाणू उपविभागातील अंकिता कैलास कणसे यांची ठाणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीत नियुक्ती करण्यात आली आहे.
अहमदनगर जिल्हा जात पडताळणी समितीचे वसंत वामन कुंवर, नागपूर शहरातील अनिता उदय मोरे आणि राज्य गुप्तवार्ता विभागातील स्वप्ना मधुकर बोधके यांची पुणे शहरात सहायक पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.
तसेच गडहिंग्लज उपविभागाचे अधिकारी रामदास जयसिंग इंगवले यांची पुणे शहरात नियुक्ती झाली आहे. यवतमाळच्या उमरखेड उपविभागातील हनुमंत अमृतराव गायकवाड यांची नंदुरबार उपविभागात बदली करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा जात पडताळणी समितीचे दत्तात्रय मारुती थोपटे यांची रत्नागिरी उपविभागात नियुक्ती करण्यात आली आहे.