शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का! तब्बल ‘इतक्या’ नगरसेवकांचे पद धोक्यात, निवडणूक शपथपत्र प्रकरण थेट न्यायालयात… उडाली खळबळ


मुंबई : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 संदर्भात शिवसेना शिंदे गटाच्या काही नगरसेवकांवर गंभीर आरोप करण्यात आले असून त्यांच्या पदांवर संकटाचे ढग जमा झाले आहेत. दिवा परिसरातून निवडून आलेल्या एकूण नऊ नगरसेवकांविरोधात निवडणूक याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

या याचिकेमध्ये आरोप करण्यात आला आहे की संबंधित नगरसेवकांनी निवडणूक नामांकनासोबत सादर केलेल्या शपथपत्रात मालमत्ता, आर्थिक माहिती, बांधकामे आणि इतर आवश्यक तपशील अपूर्ण किंवा दिशाभूल करणाऱ्या स्वरूपात सादर केले आहेत. काही ठिकाणी अनधिकृत बांधकामे आणि मालमत्ता लपवण्यात आल्याचाही दावा याचिकेत करण्यात आला आहे.

ॲड. रोहिदास मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली असून प्रकरण गंभीर स्वरूपाचे आहे. निवडणूक प्रक्रियेत उमेदवारांनी दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि पारदर्शक असणे बंधनकारक असते, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांनुसार निवडणूक शपथपत्रात चुकीची किंवा अपूर्ण माहिती देणे हे गंभीर गैरवर्तन मानले जाते. लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 अंतर्गत कलम 33A आणि 36 नुसार अशा प्रकरणांमध्ये निवडणूक रद्द होणे किंवा अपात्रतेची कारवाई होऊ शकते.

या प्रकरणात रमाकांत मढवी, शैलेश पाटील, आदेश भगत, दीपक जाधव, साक्षी मढवी, दर्शना म्हात्रे, अर्चना पाटील, दिपाली भगत आणि स्नेहा पाटील या नगरसेवकांचा समावेश आहे.

सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या घडामोडीमुळे ठाणे राजकारणात मोठी खळबळ उडाली असून शिवसेना शिंदे गट यावर काय भूमिका घेणार याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रित झाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!