‘मतचोरी’ विरोधात महाविकास आघाडी अन् मनसेचा सर्वात मोठा मोर्चा; विरोधकांच्या नेमक्या मागण्या कोणत्या?


मुंबई : मतदार याद्यामधील घोळ,निवडणूक आयोगाचा बेजबाबदार कारभार, मतचोरी, निवडणुकीतील गैरव्यवहार याबाबत मनसे आणि महाविकास आघाडीकडून सत्याचा मोर्चा मुंबईत आयोगा विरोधात काढण्यात आला आहे.या मोर्चाला उद्धव ठाकरे , राज ठाकरे , आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे उपस्थित आहेत.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना आता निवडणूक आयोगाविरुद्ध महाविकास आघाडी आणि मनसे आक्रमक झाली आहे.निवडणूक आयोगाचा बेजबाबदार कारभार, मतचोरी, मतांमधील घोळ, निवडणुकीतील गैरव्यवहार याबाबत मनसे आणि महाविकास आघाडीकडून सगळ्यात मोठा ‘सत्याचा मोर्चा’ काढण्यात आला आहे. लोकांना सत्य कळावं आणि असत्य जनतेसमोर यावं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चातून विरोधकांनी मोठ्या मागण्या केल्या आहेत.

विरोधकांच्या मागण्या काय?

       

1. सात नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी करा.

2. मतदारयाद्या अपडेट होईपर्यंत निवडणुका लांबवा.

3. मतदारयाद्यांतील दुबार नावे काढा.

4. मतदारयाद्या अद्ययावत करा.

दरम्यान दुपारी हा मोर्चा फॅशन स्ट्रीट येथून निघाला आहे आणि पुढे मेट्रो सिनेमा आणि त्यानंतर मुंबई महापालिका मुख्यालयाकडे जाईल. मुंबई महापालिका मुख्यालयाच्या इथे स्टेज उभारण्यात आला आहे, या ठिकाणी प्रत्येक पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांची भाषणं होतील. ज्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि बाळासाहेब थोरात व इतर काही महत्त्वाच्या नेत्यांची भाषणे होतील. यातून ते कोणावर निशाणा साधणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!