उन्नत मार्गांत हडपसर ते यवत व खराडी ते लोणीकंद पर्यंत मेट्रोची रचना; स्व.अजित पवार यांच्या पाठपुराव्याने मेट्रोचे स्वप्न पूर्ण; आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटकेंची माहिती…


जयदिप जाधव

उरुळी कांचन : स्व. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पाठपुरव्याने पुणे – अहिल्यानगर व पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उभा राहत असलेल्या उन्नत मार्गांवर तालुक्याचा भविष्याचा वेध घेत लोणीकंद व उरुळीकांचन हद्दीपर्यंत प्रस्तावित महामार्गावर मेट्रो धावण्याची रचना करण्यात येणार असून उन्नत मार्गाचे काय येत्या चार वर्षात पूर्ण होताच हवेली तालुक्याच्या शेवटच्या हद्दीपर्यंत मेट्रो धावणार असल्याचे स्पष्टीकरण शिरुर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी दिले आहे.

पुण्यात शनिवारी (दि.१८) रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय रस्ते वाहतुक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी,पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पुणे-सोलापूर , पुणे- अहिल्यानगर व तळेगाव, शिक्रापूर व चाकण या चारपदरी उन्नत मार्गाचे भूमिपूजन करण्यात आले. या महामार्गावर उन्नत मार्गांवर एलिव्हेटेड दुमजली उड्डानपूलासह मेट्रोची रचना करण्यात आली आहे. या रचनेत चालू कामात मेट्रोची रचना ही उरुळीकांचन व लोणीकंद पर्यंत रहदारीच्या भागापर्यंत सेवेसाठी सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी दिली.

आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके म्हणाले, शिरूर-हवेली मतदारसंघातील नागरिकांसाठी खऱ्या अर्थाने हा ऐतिहासिक क्षण आहे. कारण या दोन्ही मार्गांवरील नागरीक हे वाहतुक कोंडीच्या समस्येसह दळणवळण सुविधांनी सर्वाधिक त्रस्त झाले होते .या मार्गांवरून प्रवास करताना प्रवासी इच्छुक ठिकाणी वेळेवर पोहचतील काय, असा नेहमीचा प्रश्न होता. या त्रस्त प्रवासाने विद्यार्थी ,कामगार व नोकरदारवर्गाला शारीरिक व मानसिक दृष्ट्या मनस्ताप सहन करावा लागत होता. त्यामुळे वाहतुक कोंडीचा मुद्दा अतिशय जिकरीचा ठरत होता.

आता या उन्नत मार्गांच्या उभारणीने शहराबाहेरून येणारी वाहतुक ही थेट बायपास होणार असून दैनंदिन परिवहन सेवेला मेट्रोची भक्कम सेवा उपलब्ध होणार असल्याने परिवहन सेवेचा प्रश्न मिटणार आहे. लोणीकंद व उरुळीकांचन हद्दीपर्यंत मेट्रोची सेवा निर्माण झाल्याने महामार्गावरील दैनंदिन भार ५०% टक्के कमी आहे. पर्यायाने या ठिकाणी प्रवास सुखकर होणार असून व्यावसायिक उपलब्धीचा संधी या भागात वेगाने वाढणार आहे. तसेच या रस्त्यांसह या भागात महामार्गांना जोडणारे रस्ते हे पण पीएमआरडीच्या माध्यमातून रुंदीकरण करण्यात येणार असल्याचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!