भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला! लोखंडी सळईने भरलेल्या आयशरला पिकअपची धडक, सळया थेट पोटात घुसल्या, 4 जणांचा मृत्यू…

नाशिक : नाशिक- मुंबई महामार्गावरील उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला आहे. मुंबईकडे लोखंडी सळई घेऊन चाललेल्या ट्रकला टेम्पोने मागून धडक दिली. या सळया शरीरात घुसल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

रात्री आठच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी होऊन सुमारे पाच किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग लागली. यावेळी वाहतूक कोंडी झाली होती. हा ट्रक मुंबईच्या दिशेने लोखंडी सळया घेऊन चालला होता. मागून आलेला भरधाव टेम्पो ट्रकवर धडकला. यावेळी भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात चार जणांच्या शरीरात लोखंडी सळई घुसल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.
यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापुर्वीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेत अजून 6 जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक कोंडी झाली.

दरम्यान, अपघातात मृत व जखमी झालेले सर्वजण सिडकोतील सह्याद्रीनगर येथील रहिवासी आहेत. ते टेम्पोने निफाड तालुक्यात देवदर्शनासाठी गेले होते. मात्र येताना ही घटना घडली आहे. या अपघातात दोन्ही गाड्यांचे जबरदस्त नुकसान झाले आहे.
देवदर्शनाहून परतत असताना काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. हा अपघात नेमकं कसा झाला याबाबत पोलीस चौकशी केली जात आहे. चालकाचे गाडीवरून नियंत्रण कसे सुटले? याचा तपास पोलीस करत आहेत. या अपघाताने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत तपास सुरू आहे.