धक्कादायक घटनेने महाराष्ट्र हादरला! आश्रम शाळेतील 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू, मध्यरात्री झोपले अन्…


गडचिरोली : येथील आश्रम शाळेत एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथील धानोरा तालुक्यातील जपतलाई निवासी आश्रम शाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू, तर तीन विद्यार्थिनी जखमी असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

दीपिका लकडा, सुष्मिता मंडल आणि अनु कोरेटी असे मृत्यू झालेल्या तीन विद्यार्थिनींची नावे आहेत. या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच दीपिका मदवी, कविता किरंगा आणि समृद्धी नैताम या तीन विद्यार्थिनींवर गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

यापैकी समृद्धी सुरेश नैतम हिची प्रकृती गंभीर आहे. रात्री दोन ते अडीच वाजताच्या सुमारास विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याची घटना समोर आली. या घटनेनंतर विद्यार्थिनींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. धानोरा रुग्णालयात दीपिका लकडा आणि सुष्मिता मंडल या दोन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला.

तसेच गडचिरोलीच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना अनु कोरेटी हिचाही मृत्यू झाला. तसेच सिंधुदुर्गमधील आंबोलीमध्ये मुख्य धबधब्यावर पर्यटकाचा सर्पदंश झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे पर्यटन करताना देखील काळजी घेण्याची गरज आहे. कर्नाटक राज्यातील हा पर्यटक असल्याची माहिती आहे.

गंगाधर मरिअप्पा कोरावार, विजयनगर, कर्नाटक असे मृत्यू झालेल्या पर्यटकाचे नाव आहे. या घटनेमुळे आंबोलीतील पर्यटकांमध्ये तसेच स्थानिक परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सावंतवाडी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!