शेतकरी आत्महत्याबाबत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर, लोकप्रियतेच्या बाबतीत दहाव्या स्थानी, धक्कादायक वास्तव समोर…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक भयंकर वास्तव समोर आनले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांनी याबाबत एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी राज्य सरकार जोरदार टीका केली आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काही माहिती समोर आनली आहे.

यामध्ये रोहित पवार म्हणाले, एकीकडे लोकप्रियतेच्या बाबतीत महाराष्ट्र दहाव्या स्थानी घसरला आहे तर शेतकरी आत्महत्या, भ्रष्टाचाराच्या बाबतीत महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकवला आहे. गेल्या काही दिवसांपासुन राज्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर संकटात सापडला आहे.
शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून, सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी न ठेवता cost escalation करून दलालांना, गुंडाना केंद्रस्थानी ठेवून कारभार केला तर हेच होणार आहे. ५० कोटीच्या मोठमोठ्या जाहिराती करून लोकप्रिय होता येत नाही, असेही आमदार रोहित पवार यांनी सांगितले आहे.

लोकप्रिय होण्यासाठी जनतेला केंद्रस्थानी ठेवून पारदर्शक कारभार करावा लागतो, जाहिराती करून केवळ नटवरलाल होता येते. असेही आमदार रोहित पवार यांनी म्हटले असून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. यामुळे आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
