Maharashtra Politics : ठरलं! राज्यात पुन्हा देवेंद्रच, नव्या सरकारचा शपथविधीची वेळ आणि ठिकाणीही आलं समोर…

Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीची सरशी झाली. विधानसभा निवडणुकीत तमाम राजकीय विश्लेषक आणि बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजापेक्षाही उत्तम कामगिरी करत महायुतीने जोरदार मुसंडी मारली.
महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांना मिळून २३४ जागा मिळाल्या असून, यामध्ये भाजपला १३२ जागा मिळाल्या आहेत, त्यामुळे भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर ८ दिवस उलटले तरी सरकार स्थापन झालेले नाही.
त्यातच गेल्या काही दिवसांपासून महायुतीत आधी मुख्यमंत्रिपदावरुन आणि आता गृहमंत्रिपदावरुन वाद सुरु झाला आहे. त्यातच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्रातील नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार याची तारीख निश्चित झाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या ५ डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यासाठी मुंबईतील खास ठिकाणही निश्चित करण्यात आले आहे. मुंबईतील आझाद मैदानात महाराष्ट्रातील नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. आझाद मैदानात संध्याकाळी ५ वाजता हा शपथविधी सोहळा होणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी देशातील भाजपचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. Maharashtra Politics
याच पार्श्वभूमीवर येत्या २ किंवा ३ डिसेंबर रोजी भाजपच्या सर्व आमदारांची बैठक पार पडेल. महायुतीच्या नव्या सरकारचा मेगा शपथविधी सोहळा पार हा ५ डिसेंबरला पार पडेल. त्यापूर्वी २ किंवा ३ डिसेंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रातील नेत्यांशी संवाद साधणार आहेत.
दरम्यान, यावेळी सर्व आमदारांना येत्या ५ डिसेंबरला महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. या शपथविधीला सर्व आमदारांना उपस्थित राहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या राज्यात सर्वत्र महायुतीचे सरकार येत असल्याने जल्लोष केला जाणार आहे.