Maharashtra Politics : पुण्याच्या पालकमंत्रीपदावरुन महायुतीत चढाओढ सुरू, राष्ट्रवादीवाले आग्रही, तर चंद्रकांत पाटलांचे मोठं वक्तव्य….


Maharashtra Politics : मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी काल शपथ घेतली. त्यावेळी एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांनी उपमुख्यमंत्री पदाची देखील शपथ घेतली. त्या शपथविधीनंतर आगामी कालावधीत महायुतीमधील नेत्यांना कोणतं मंत्रीपद किंवा कोणत्या नेत्यांची कोणत्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी वर्णी लागणार, यावर चर्चा सुरू झाल्या आहेत.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईनंतर राज्यातील वेगाने वाढणारं शहर म्हणून पुणे शहराची देशभरात ओळख आहे. आयटी हब, सर्व्हिस सेक्टर, शैक्षणिक पंढरी आणि स्थलांतरीतांचे माहेरघर बनत असलेल्या पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरुन आता चर्चा सुरू झाल्या आहेत.

अजित पवार की चंद्रकांत पाटील या नावांमध्ये सध्या पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरुन दोन्ही पक्षांतील नेत्यांकडून दावा केला जात आहे. पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून आणि अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून आमच्याच नेत्याला संधी देण्यात यावी, अशी इच्छा व्यक्त केली जात आहे. Maharashtra Politics

विशेष म्हणजे दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून तशा मागणीला जोर देखील धरला जातोय. याबाबत, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता, महायुतीत जर काही झाले तर समजूतदारपणा दाखवायला हवा, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

दरम्यान, अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी अजित पवारांना पालकमंत्री करावं अशी मागणी केली आहे. त्यामुळे, पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरुन महायुतीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!