Maharashtra Election Result : बारामतीत अखेर अजित पवारच ठरले किंग! पुतण्या युगेंद्र पवार यांचा मोठा पराभव…


Maharashtra Election Result : महाराष्ट्राच्या २०२४च्या विधानसभेच्या निवडणुकीचा आज निकाल लागतोय. राज्यात कोणाची सत्ता येणार हे चित्र सध्या स्पष्ट होत आहे, आतापर्यंत आलेल्या आकड्यांवरून महायुतीची सत्ता राज्यात येणार असल्याचं दिसत आहे.

तर ज्या मतदार संघाकडे अवघ्या महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं लक्ष लागलं होतं, त्या बारामती मतदार संघात अजित पवारांचा मोठा विजय झाला आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांना पराभूत केलं आहे.

अजित पवार यांना ७३ हजार ०२५ मतं मिळाली आहे. तर शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांना ३४ हजार ७७३ मतं मिळाली आहे. अजित पवार यांनी तब्बल ३८ हजार २५२ मतांनी आघाडी मिळवली आहे. Maharashtra Election Result

विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्याविरोधात त्यांचेच सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांना उतरविले गेले. बारामती विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार यांनी अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनाच उमेदवारी दिली होती. परंतु बारामतीकरांची पसंती अजित पवार यांना राहिली आहे.

दरम्यान, बारामतीमध्ये चुरशीची लढत झाली होती. पक्षांतर व पक्षफुटीचे राजकारण झाल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्यामुळे ही प्रतिष्ठेची बनली होती. बारामतीच्या निकालाकडे फक्त राज्याचे नाही तर देशाचे लक्ष लागले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!