Maharashtra Election Opinion Poll : जर आज विधानसभा निवडणूक झाली तर कोण जिंकणार? ओपिनियन पोलचा वेगळाच अंदाज आला समोर, दिग्गज नेत्यांची उडाली झोप…


Maharashtra Election Opinion Poll : केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीर आणि हरियाणामधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. या दोन्ही राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल ४ ऑक्टोंबर रोजी येणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे फटाके दिवाळीनंतरच उडणार आहे. राज्यातील सर्व पक्ष आणि महायुती तसेच महाविकास आघाडी निवडणुकीच्या तयारीला लागले असताना एक ओपिनियन पोल समोर आले आहे ज्यात राज्यात आज निवडणुका झाल्यास कोणाची सत्ता येईल? त्याच बरोबर कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. Maharashtra Election Opinion Poll

एका सर्व्हेमध्ये महाराष्ट्रात कोणत्या पक्षाचे सरकार येऊ शकते आणि प्रत्येक पक्षाला किती जागा आणि किती टक्के मते मिळतील याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ओपिनियन पोलमध्ये लोकांना विचारण्यात आले होते की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काम कसे आहे? ३५ टक्के लोकांनी खुप चांगले काम असल्याचे उत्तर दिले आहे. २१ टक्के लोकांनी सरासरी तर ३० टक्के लोकांनी चांगले नाही असे मत नोंदवले आहे. १४ टक्के लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या कामावर काही प्रतिक्रिया दिलेली नाही.

कोणाला किती जागा मिळणार?

ओपिनियन पोलनुसार सर्वाधिक जागा भारतीय जनता पक्षाला मिळणार आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष बनत आहे. भाजपला ९५-१०५ जागा मिळण्याचा अंदाज ओपिनियन पोलमध्ये आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला चांगलाच फटका बसणार आहे.

शिंदेसेनेला केवळ १९-२४ जागा मिळणार आहे. त्यापेक्षा मोठा झटका अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला बसणार आहे. त्यांना केवळ ७-१२ जागा मिळणार आहे. तिन्ही पक्ष मिळून बहुमत मिळत नाही. महायुतीला सत्तेत येण्यासाठी इतरांची गरज लागणार आहे.

महाविकास आघाडीत काँग्रेस मोठा..

महाविकास आघाडीत सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस समोर आला आहे. काँग्रेसला ४२ ते ४७ जागा मिळत असल्याचा अंदाज आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला २६ ते ३१ जागांवर समाधान मानावे लागणार आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी पुन्हा एकदा चांगली कामगिरी करत आहे. या पक्षाला २३ ते २८ जागा मिळण्याचा अंदाज ओपिनियन पोलमध्ये आहे. महाविकास आघाडी सत्ता स्थापनेपासून बरीच लांब आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!