Maharashtra Budget 2024 : अजित पवारांची मोठी घोषणा! पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार, वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार, जाणून घ्या…
Maharashtra Budget 2024 : विधानसभा निवडणुका अवघ्या काहीच महिन्यांवर आल्या असल्याने या अंतरिम अर्थसंकल्पात अनेक घोषणांचा पाऊस पडला. या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा अजित पवारांनी केली आहे. याअंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन मोफत गॅस सिलिंडर मिळणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
अजित पवार यांनी सादर केलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात पेट्रोल व डिझेल वरील मुल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याची तरतूद केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच उद्योग व व्यापार क्षेत्राला दिलासा मिळणार आहे.
या अर्थसंकल्पात पाच केंद्रीय सशस्त्र दलातील जवानांना व्यवसाय करातून सूट, मुद्रांक शुल्क दंडात कपात, मुद्रांक शुल्क परतावा आदी माध्यमातून नागरिकांना दिलासा देण्यात आला आहे.
नवी मुंबई, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील नागरिक व प्रवाशांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आता सवलत मिळणार आहे. कारण, राज्य सरकारच्या निर्णयामुळे या तिन्ही जिल्ह्याच्या क्षेत्रात पेट्रोल व डिझेलचे दर कमी होणार आहेत. ग्राहकांना पेट्रोलमध्ये प्रति लिटर 65 पैसे, तर डिझेलमध्ये प्रति लिटर 2.7 पैसे रुपये कमी होणार आहेत. Maharashtra Budget 2024
पेट्रोल व डिझेलवरील मुल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याच्यादृष्टीने बृहन्मुंबई, ठाणे व नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील डिझेलवरील सध्याचा कर २४ टक्क्यांवरुन २१ टक्के प्रस्तावित करण्यात आला आहे. तसेच, पेट्रोलचा सध्याचा कर 26 टक्के अधिक प्रति लिटर ५ रुपये १२ पैसे वरुन २५ टक्के अधिक प्रति लिटर ५ रुपये १२ पैसे करण्याचे प्रस्तावित केले आहे.
त्यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच उद्योग व व्यापार क्षेत्राला दिलासा मिळणार आहे. या बदलामुळे ठाणे, बृहन्मुंबई आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील पेट्रोलचा दर अंदाजे ६५ पैसे व डिझेलचा दर अंदाजे २ रुपये ७ पैसे प्रति लिटर स्वस्त होणार आहे.