Maharashtra : विधानसभा निवडणुकीआधी महायुतीला मोठा धक्का! मोठा मित्रपक्ष बाहेर पडला, स्वबळावर लढणार…


Maharashtra : विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा होताच महायुतीला मोठा धक्का बसला आहे. धानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर २४ तासांमध्येच महायुतीला पहिला धक्का लागला आहे. महायुतीमधून पहिला मित्रपक्ष बाहेर पडला आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री महादेव जानकर महायुतीच्या बाहेर पडले आहेत. आमदारकीची टर्म पुन्हा न मिळाल्यामुळे महादेव जानकर नाराज होते. महायुतीमधून बाहेर पडल्यानंतर महादेव जानकर विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार आहेत. आज झालेल्या महायुतीच्या पत्रकार परिषदेलाही महादेव जानकर उपस्थित नव्हते.

महादेव जानकर यांचा पक्ष आता राज्यात स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. महायुतीतील जागावाटपावरून जानकर नाराज असल्याची चर्चा होती. गेल्या काही दिवसांपासून महादेव जानकर हे महायुतीमध्ये नाराज असल्याची माहिती आहे.

महायुतीकडे विधानसभेसाठी त्यांनी ४० ते ५० जागांची मागणी केली होती. पण त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळेच त्यांनी आता महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष आता राज्यात सर्व जागा स्वबळावर लढणार आहेत. Maharashtra

महादेव जानकरांनी लोकसभा निवडणूक ही महायुतीच्या माध्यमातून लढवली होती. मात्र परभणीतून त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर विधानसभेला आपल्या पक्षाला सन्मानजनक जागा मिळाव्यात यासाठी जानकर प्रयत्नशील होते. पण त्यांना अपेक्षित जागा मिळणार नाही असं लक्षात येताच त्यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!