लोणीकाळभोर पोलिसांची उल्लेखनिय कामगिरी, अमित सोनवणे, गणेश भोसले दोन वर्षांसाठी तडीपार…!

उरुळी कांचन : लोणी काळभोर येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये त्याचप्रमाणे पुणे शहरातील जनतेचे रक्षण व्हावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे पोलीस आयुक्त म्हणुन पदभार स्विकारल्या नंतर लगेच कारवाईला सुरुवात केली आहे.
परिसरात अनुचित प्रकार घडू नये त्याचप्रमाणे पुणे शहरातील टोळी गुन्हेगार, बेकायदेशीर धंदे यावर आळा घालण्याचे काम सुरू केले आहे.
यानुसार सव्हेलन्स अधिकारी पोलीस उपनिरीक्षक धायगुडे, तसेच पोलीस सातपुते आणि धनवटे यांनी पोलीस स्टेशनचे अभिलेखावरील गुन्हेगारांचा शोध घेत आहे. सराईत गुन्हेगार अमित बालाजी सोनवणे (वय २४ वर्षे रा. लोणीकाळभोर) व गणेश बाळू भोसले वय (वय २० वर्षे रा. लोणीकाळभोर) यांच्यावर कारवाई केली आहे.
त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. यामुळे टोळीचा तडीपारीचा प्रस्ताव तयार करून पुणे जिल्हयातून दोन वर्षा करीता तडीपार २ वर्षाकरिता तडीपार करण्याचा आदेश पारित केला आहे. सदरची कारवाई रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, रंजन शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर, मा. विक्रांत देशमुख, पोलीस उपआयुक्त परि. ०५, पुणे शहर, बजरंग देसाई, सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. सुभाष काळे पोलीस निरीक्षक गुन्हे, पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे, पोलीस हवालदार गणेश सातपुते, पोलीस नाईक संदिप धनवटे, यांनी केली आहे.