Loni Kalbhor : नायगाव येथे रस्ता सुरक्षेबाबत जनजागृतीसाठी ‘रस्ता सुरक्षा सप्ताहा’चे आयोजन…


Loni Kalbhor  लोणी काळभोर : सुरक्षितता ही फक्त घोषणा नाही, जीवनाचा एक मार्ग आहे. रस्ता सुरक्षेबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने दरवर्षी देशात ‘रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा’ केला जातो. यावर्षी ११ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत केंद्र सरकारचे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय रस्त्यांवरील सुरक्षितता सुधारण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि सर्व संबंधितांना या निमित्ताने योगदान देण्याची संधी देण्यासाठी ‘रस्ता सुरक्षा सप्ताह’ आयोजित करण्यात येतो.

नायगाव (ता. हवेली) येथील अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड पुणे बल्क टर्मिनल पेठ, नायगाव (ता. हवेली) या ठिकाणी ३५ वा सडक सुरक्षा साप्ताहचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अमर देसाई बोलत होते.

यावेळी सहायक मोटार वाहन निरीक्षक दिनेश पाटील, कंपनी विभागाच्या प्रमुख निशा जैन, कंपनीचे लॉजीस्टिक हेड मधुकर सांगा, इम्रान खान, प्रकाश मेवाडे, नंदकुमार झगडे, ज्ञानेश्वर पाटील, अमित गायकवाड, अरुलराज शेट्टी, राजेंद्र बगाडे, शंकर कुंभारकर आदि उपस्थित होते. Loni Kalbhor

मोटार वाहन निरीक्षक देसाई म्हणाले की, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक आहे. नागरिकांनी सीट बेल्ट, हेल्मेट आणि इतर सुरक्षा साधनांचा वापरास प्रोत्साहन दिल्यास अपघातास आळा बसू शकतो.

अपघात झाल्यानंतर जखमींना मदत करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज असून अपघातानंतर बघ्याची भूमिका घेऊ नका, वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळा. तसेच शारीरिक व मानसिक स्थिती बरोबर असेल तरच वाहन चालविले पाहिजे. असे ते म्हणाले आहे.

दरम्यान, कंपनीतील कर्मचाऱ्यांकडून वाहनचालकांना तसेच उपस्थित असलेल्या नागरिकांना सडक सुरक्षा अभियानाचे पथनाट्य दाखवण्यात आले. तसेच चालकांना व कंपनीतील कामगारांना लायसन्स व इतर प्रमुख कागदपत्रांचे महत्व सांगून वाहनधारकांना रस्ता सुरक्षेचे महत्त्व पटवून दिले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!