Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच ठरलं? मार्चच्या पहिल्या आठवड्यात कार्यक्रम, जाणून घ्या…

Loksabha Election 2024 : देशात आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असून निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. तसेच सर्व पक्ष देखील आपल्या उमेदवारांची चाचपणी करत आहेत. सध्या निवडणूक आयोग काही नवीन नियम बनविण्याचे काम देखील सुरु आहे.
मतदार यादी अंतिम करण्याचे काम सुरु आहे. निवडणूक आयोग काही दिवसातच निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे. यानुसार फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणूक कार्यक्रम तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे आता काही दिवसांमध्येच कार्यक्रम जाहीर होणार आहे.
दरम्यान, विद्यमान लोकसभेची मुदत १६ जून रोजी संपुष्टात येत आहे. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीची घोषणा १० मार्चला झाली होती. तसेच ११ एप्रिल ते १९ मे या काळात सात टप्प्यांमध्ये लोकसभेसाठी मतदान झाले होते. यामुळे आता असच काहीस चित्र असणार आहे.
यामुळे नियोजित वेळेनुसार निवडणुकीची घोषणा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते. पण यंदा लोकसभा निवडणूक मार्च – एप्रिलमध्येच घेतल्या जातील, अशी चिन्हे आहेत. येणाऱ्या काही दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होणार आहे. Loksabha Election 2024
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ म्हणाले, लोकसभा आणि विधानसभेसाठी लवकरच आचारसंहिता लागू होईल. देशात सात टप्प्यांत लोकसभेच्या निवडणुका होणार असल्याची आमच्यापर्यंत माहिती आहे.
तीन ते चार महिने निवडणुकीत जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत. दरम्यान, सध्या सर्व पक्ष हे कामाला लागले असून उमेदवार देखील प्रचाराला लागले आहेत.