Loksabha Election 2024 : निवडणूक काळात जाहिरातबाजीवर करोडो रुपयांची उधळपट्टी, तीन महिन्यात १०० कोटींचा खर्च…


Loksabha Election 2024 : निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. गेल्यावेळेप्रमाणे यंदाही सात टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिलला मतदान होणार आहे, तर सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी १ जूनला मतदान होणार आहे.

यावेळी सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) विजयाची हॅट्ट्रिक करण्याचा प्रयत्न करत आहे, तर विरोधी पक्षांनीदेखील जोर लावला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी आता चुरशीच्या लढती होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ऑनलाईन जाहिराती वाढल्या आहेत. गूगलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी केली जात आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी जाहिरातबाजीवर जोर दिला आहे. त्यात ऑनलाईन जाहिराती वाढल्या आहेत. यात पोर्टलदेखील मागे नाहीत. त्यात गेल्या काही महिन्यांत विविध राजकीय पक्षांनी गुगलच्या माध्यमातून त्यांचा जाहिरात खर्च वाढवला आहे.

राजकीय जाहिरातींवरचा खर्च गेल्या ३ महिन्यांत मार्चपर्यंत जवळपास १०० कोटींवर पोहोचला आहे. ही रक्कम गेल्या वर्षीच्या ११ कोटी रुपयांपेक्षा ९ पट अधिक आहे. या अशा जाहिराती आहेत ज्या राजकीय पक्षांच्या चिन्हांसह आहेत. ही आकडेवारी १७ मार्चपर्यंतची आहे.

२०१९ पासून (गुगलने डेटा गोळा करण्यास सुरुवात केली तेव्हापासून) तीन महिन्यांत गुगलवर राजकीय जाहिरातींसाठी केलेला सरासरी खर्च सर्वाधिक होता. या आकड्यांमध्ये सर्च, डिस्प्ले, यूट्यूब आणि जी मेलवर दाखवलेल्या जाहिरातींचा समावेश आहे.

गुगलला उत्तर प्रदेशातून सर्वाधिक राजकीय जाहिराती देण्यात आल्या. यानंतर ओडिशा, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि गुजरातचा क्रमांक लागतो. एकूण जाहिरात खर्चापैकी ४० टक्के खर्च पाच राज्यांमधून झाला आहे.

भाजपचा सर्वाधिक खर्च…

गुगलच्या आकडेवारीनुसार जानेवारीपासून भारतीय जनता पक्षाने (भाजप) सर्वाधिक जाहिराती दिल्या आहेत. भाजपने गुगल जाहिरातींवर ३०.९ कोटी रुपये खर्च केले आहेत. या कालावधीत काँग्रेसने केवळ १८.८ लाख रुपये खर्च केले आहेत. एकूण रकमेपैकी ८६.४ टक्के रक्कम व्हिडिओ जाहिरातींवर खर्च करण्यात आली आहे. उर्वरित १३.६ टक्के फोटो फॉरमॅटमधील जाहिरातींवर खर्च करण्यात आला आहे.

दरम्यान, २०२४ चा जानेवारी महिना उजाडला, त्याच्या अगोदरपासून लोकसभा निवडणुकीची वातावरण निर्मिती सुरू झाली. सत्ताधारी भाजपने तर वेगवेळ्या इव्हंटच्या माध्यमातून अधिक जोर लावला. त्यात विरोधी पक्षही मागे राहिले नाहीत. विविध ठिकाणी जाहीर कार्यक्रम घेतानाच ऑनलाईन जाहिरातीसाठी गूगलची मदत घेण्यात आली. त्यामुळे गूगलवरील जाहिरातीचा खर्च अनेक पटींनी वाढला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!