Lok Sabha Election : बारामती, मावळ, शिरुरमध्ये मतदार आक्रमक, लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार, महत्वाचे प्रश्न केले उपस्थित, नेमकं घडलं काय?

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाणे जाहीर केली आहे. याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. देशात लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यात पार पडणार आहेत.
यातील पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिलला होणार आहे तर ४ जूनला याचा निकाल लागणार आहे. तसेच राज्यात देखील लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. प्रत्येकजण मतदानाचे आवाहन करताना दिसत आहे. उमेदवार प्रत्येक मतदारांच्या दाराशी जाऊन भेटीगाठी घेत आहे. एवढंच नाही तर मतदारांचे प्रश्न जाणून घेताना दिसत आहे.
अशातच आता बारामती, मावळ, शिरुर लोकसभा मतदार संघातील मतदारांनी निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला आहे. या लोकसभा मतदार संघाच्या विविध मागण्यांसाठी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. रस्ते, पाणी, मराठा आरक्षण, रेल्वे गाडी या मागण्यांचा त्यात समावेश आहे. यासोबतच राज्यात तब्बल ६५ गावातील ४१ हजार ४४० मतदारांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
मावळ मतदारसंघात कोंडीची वाडी येथील ७० ते ८० मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. रस्त्याच्या कामांसाठी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच जमिनीच्या अधिग्रहणाच्या मोबदल्यासाठी हनुमान कोळीवाडा आणि करंजा गावातील ४०० ते ४५० मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. Lok Sabha Election
त्यासोबतच बारामती लोकसभा मतदारसंघातील बहिष्कार टाकणार्या मतदार संघाची संख्या अधिक आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पान्हवळ गावातील १२०० ते १३०० मतदारांचा निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.
त्यातच मोकाट जनावरांमुळे शेतीचे नुकसान होत असल्याने उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी मोढवे गावातील २ हजार ७०० मतदारांचा निवडणुकीवर बहिष्कार टाकलाय तर दौंड शहराला उपनगरचा दर्जा द्यावा, लोकल सुरू करावा आणि उड्डाण पुलाच्या मागणीसाठी ३ हजार ते ३ हजार ५०० मतदारांचा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.