मुलीच्या लग्नासाठी घेतलं कर्ज, सावकाराने बापाला लोखंडी रॉडने केली जबर मारहाण, व्याजाच्या पैशावरून दौंडमध्ये धक्कादायक प्रकार…

दौंड : येथील एका मजुरासोबत सावकारी व्याजाच्या पैशांवरून धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या मुलीच्या लग्नासाठी सावकाराकडून ४० हजार रुपये १० टक्के व्याजदराने शहरातील एका खासगी सावकाराकडून घेतले होते. ते पैसे परत घेण्यासाठी सावकाराने मजुराला चौघांनी लोखंडी रॉड जबर मारहाण केली.

रात्री साडेअकरा वाजल्यापासून ते मध्यरात्री दीड वाजेपर्यंत पानसरे वस्ती नवीन कोर्ट शेजारी दौंड व हिंदुस्तान चर्चच्या शेजारी ही घटना घडली. याबाबत पोलीस तपास सुरू आहे. विनोद माने हे ठरलेल्या व्याजानुसार वेळोवेळी व्याज हे आरोपीला देत होते. मात्र आरोपी साहील जाधव व जेकाप जाधव याने माने यांच्या घरात घुसून शिवीगाळ व दमदाटी केली.
याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहील विनोद जाधव, जेकाप सुनिल जाधव, अनुज जाधव व विनोद दत्तु जाधव (सर्व रा. बंगला साइट, हिंदुस्तान चर्चचे शेजारी, दौंड ता. दौंड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणाने सावकारी पुन्हा एकदा पुढे आली आहे.

या दोघांनी माने यांना जबरदस्तीने दुचाकी गाडीवर बसवून विनोद जाधव यांच्या घरी घेऊन गेले. घरी नेऊन शिवीगाळ करून तू माझे पैसे देतो का, का माझ्याकडे कामाला राहतो? असे म्हणून सर्व आरोपींनी लोखंडी रॉडने मारून जबर दुखापत केली व जीवे मारण्याची धमकी दिली.

विनोद माने यांनी तक्रार दिल्यानंतर चौघांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके करीत आहेत. या घटनेने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या घटना समोर येत आहेत.