विधान परिषद निकाल जाहीर! पाहा 17 जागांवरील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी


नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून राज्यातील 17 पैकी 16 जागांवर महायुतीने विजय मिळवत आपले वर्चस्व कायम राखले आहे. मात्र नाशिकमध्ये महायुतीला अनपेक्षित धक्का बसला असून अपक्ष आणि भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी विजय मिळवला आहे.

या निवडणुकीसाठी 18 जून रोजी मतदान झाले होते. त्यापूर्वीच 17 पैकी 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित 11 जागांच्या निकालात भाजपने सर्वाधिक 11 जागा जिंकल्या, तर शिवसेनेला 3, राष्ट्रवादी काँग्रेसला 2 आणि अपक्ष उमेदवाराला 1 जागा मिळाली.

नाशिकमध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव करत गोकुळ गीते यांनी विजय मिळवला. त्यामुळे हा निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीला या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. बहुतांश ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांनी विजयाची पताका फडकावली.

विधान परिषद निवडणुकीतील विजयी उमेदवार..

ठाणे – रवींद्र फाटक (शिवसेना) – बिनविरोध
यवतमाळ – दुष्यंत चतुर्वेदी (शिवसेना) – बिनविरोध
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग – अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस) – बिनविरोध
पुणे – विक्रम काकडे (राष्ट्रवादी काँग्रेस) – बिनविरोध
वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर – अरुण लखाणी (भाजप) – बिनविरोध
अहिल्यानगर – प्राजक्त तनपुरे (भाजप) – बिनविरोध
छत्रपती संभाजीनगर-जालना – सुहास शिरसाट (भाजप)
नाशिक – गोकुळ गीते (अपक्ष)
भंडारा-गोंदिया – अविनाश ब्राह्मणकर (भाजप)
सांगली-सातारा – धैर्यशील कदम (भाजप)
परभणी-हिंगोली – सईद खान (शिवसेना)
सोलापूर – राजेंद्र राऊत (भाजप)
धाराशिव-लातूर-बीड – बसवराज पाटील (भाजप)
नागपूर – राजीव पोतदार (भाजप)
जळगाव – नंदकिशोर महाजन (भाजप)
अमरावती – प्रवीण पोटे (भाजप)
नांदेड – अमर राजूरकर (भाजप)

मतदानाची टक्केवारी

नाशिक – 100%
भंडारा-गोंदिया – 100%
सांगली-सातारा – 99.89%
परभणी-हिंगोली – 99.78%
सोलापूर – 99.68%
धाराशिव-लातूर-बीड – 99.49%
छत्रपती संभाजीनगर-जालना – 98.90%
नागपूर – 98.44%
जळगाव – 97.78%
अमरावती – 94.68%

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!