लक्ष्मण हाकेंची आता नवीन मागणी! नव्या मागणीने राज्यातलं वातावरण तापलं, नेमकं घडतंय काय?


मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. तसेच महाराष्ट्रात सध्या आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नव्या मागणीने राजकीय वातावरण आणखी पेट घेतले आहे.

हाके यांनी नाभिक आणि धोबी समाजाला थेट SC प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे समाजामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत असून संघर्षाचे चित्र दिसत आहे.

तसेच राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर ओबीसी समाजाकडून तीव्र विरोध सुरू आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण नको, अशी भूमिका ओबीसी समाजाने स्पष्ट केली आहे.

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर बंजारा समाजाने एसटी प्रवर्गात समावेशाची मागणी करत आंदोलन सुरू केले आहे, तर आदिवासी समाज या मागणीला विरोध करत आहे. यामुळे आदिवासी आणि बंजारा समाज आमनेसामने आले आहेत. दुसरीकडे, जालन्यात धनगर समाजाचे आंदोलन सुरू असून त्यांनीही एसटी प्रवर्गात समावेशाची मागणी केली आहे.

या सर्व आंदोलनांच्या धगीवर लक्ष्मण हाके यांनी वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी म्हटले की, बलुत्या-आलुत्या वाल्यांमध्ये आमचा नाभिक समाज, धोबी समाज आहे. या समाजांना SC प्रवर्गात आरक्षण मिळावे. कारण देशातील अनेक राज्यांमध्ये हे समाज SC मध्ये समाविष्ट आहेत. महाराष्ट्रातही त्यांना हा लाभ मिळायला हवा. जर सरकारने आम्हाला SC किंवा STमध्ये दिले तर आम्हाला त्याचा आनंदच आहे.

हाके यांच्या मागणीनंतर दलित संघटनांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी कठोर इशारा देताना म्हटले की, SC आरक्षणाकडे वाकड्या नजरेने पाहू नये, अन्यथा डोळे काढून हातात देऊ.” तर सचिन खरात यांनी चेतावणी दिली की, आमच्या SC समाजाला खवळवू नका, नाहीतर पुन्हा भीमा कोरेगावचा इतिहास घडेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!