लॉरेन्स बिश्नोई गँगला दहशतवादी संघटना घोषित, कॅनडा सरकारचा मोठा निर्णय..

नवी दिल्ली : कॅनडा सरकारने लॉरेंस बिश्नोई गँगला दहशतवादी संघटना म्हणून अधिकृतपणे घोषित केले आहे. या निर्णयामुळे बिश्नोई गँगच्या संपत्तीवर कारवाई करण्यास आणि त्यांच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्यास कॅनडा पोलिसांना अधिक अधिकार मिळाले आहेत.

कॅनडा सरकारने म्हटले आहे की, हिंसा आणि दहशतवादाला कॅनडामध्ये स्थान नाही, विशेषतः जेव्हा ते विशिष्ट समूदायांना लक्ष्य करून भीती आणि धमकीचे वातावरण निर्माण करतात.
लॉरेंस बिश्नोई गँग ही एक आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना आहे. त्यांचे मुख्य काम भारतातून चालत असून कॅनडामध्ये ही गँग सक्रिय आहे. या गँगच्या सदस्यांनी विविध गुन्ह्यांमध्ये सहभाग घेतला आहे, ज्यात हत्या, गोळीबार खंडणी वसूली, आणि धमकी यांचा समावेश आहे.

कॅनडामध्ये विशेषतः शिख समूदायाशी संबंधित व्यक्तींना या गँगने लक्ष्य केले आहे.२०२३ मध्ये ब्रिटीश कोलंबियामध्ये शिख कार्यकर्ता हरदीप सिंग निज्जर यांची हत्या करण्यात आली. त्या हत्येमागे बिश्नोई गँग असल्याचा आरोप आहे.

कॅनडा सरकारने बिश्नोई गँगला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केल्यानंतर, या गँगच्या संपत्तीवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. कॅनडा पोलिसांना या गँगच्या सदस्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी अधिक अधिकार मिळाले आहेत.
भारत सरकारने कॅनडाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे आणि या बिश्नोई गँगच्या सदस्यांना भारतात आणण्यासाठी कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. आता कॅनडाने या गँगच्या सदस्यांविरुद्ध कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी केली पाहिजे.