लाडक्या बहिणींचं अवघडच झालं!! 2100 सोडा पण 1500 पण मिळणार नाहीत? जाणून घ्या…

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांची अर्जाची तपासणी केली जाणार आहे. तर, दुसरीकडे अर्जांची छाननी कशी होणार, कोण करणार आणि कधी होणार अशा विविध प्रश्नांमुळे लाभार्थी महिला संभ्रमात आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याबाबत बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी जाहीर केले. लाभार्थी महिलांची अर्ज तपासणी करताना कुटुंबाचे उत्पन्न तसेच विवाहानंतर परराज्यात स्थायिक असलेल्या महिला आणि कुटुंबात चारचाकी असलेल्या महिलांना लाभ मिळणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे आता येणाऱ्या काळात काय होणार हे लवकरच समजेल.
यामुळे आता लाडकी बहीण चिंतेत आहे. निकष डावलून योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची रक्कम सरकारजमा होणार असल्याची चर्चा आहे. शासनाने धुळे येथील महिलेकडून पाच महिन्यांचे सात हजार पाचशे रुपये परत घेतल्याचे समाजसमाध्यमांवर झळकल्याने महिलांमध्ये योजनेबद्दल प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे.
दरम्यान, अर्ज छाननीबाबत अद्याप सूचना नसल्याचे जिल्हा महिला व बाल विकास विभागाकडून सांगण्यात आले आहे. अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे निकष डावलून लाभ घेतलेल्या महिलांचे एकवीसशे होणार की पंधराशेही जाणार, हा प्रश्न उभा ठाकला आहे.
दरम्यान, अर्जांची छाननी कशी होणार, कोण करणार आणि कधी होणार अशा विविध प्रश्नांमुळे लाभार्थी महिला संभ्रमात आहेत. असे असताना पैसे माघारी घेतल्याने महिला मात्र चिंतेत आहेत.