Ladki Bahin Yojana 2024 : लाडकी बहीण योजनेला सतरा विघ्न!! आता ऑनलाईन काम करणार नाही, अंगणवाडी सेविकांचा निर्णय…


Ladki Bahin Yojana 2024 : महाराष्ट्रात सध्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देणार आहे.

अशातच आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन काम करणार नसल्याचं सोलापुरातील अंगणवाडी सेविकांनी म्हंटले आहे. केवळ ऑफलाईन फॉर्म स्वीकारून प्रकल्प कार्यालयात जमा करू, पण ऑनलाईन अर्ज भरणार नाही अशी भूमिका सोलापुरातील अंगणवाडी सेविकांनी घेतल्याचं दिसून येत आहे.

महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघटनेने ही भूमिका स्पष्ट केली आहे. सोलापूरसह राज्यात लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरण्याचं काम सुरू आहे. काही ठिकाणी या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी पैसे घेत असल्याचं समोर आलंय तर काही ठिकाणी सर्व्हर डाऊनची समस्या सुरू आहे. Ladki Bahin Yojana 2024

अशात आता सोलापुरातील अंगणवाडी सेविकांनी ऑनलाईन फॉर्म भरण्याचे काम न करण्याची भूमिका घेतली आहे. मानधनवाढीसाठी सोलापूर जिल्हा परिषदिसमोर अंगणवाडी सेविकांनी थाळीनाद आंदोलन केलं.

महाराष्ट्रातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणता मग अंगणवाडी सेविका तुमच्या बहिणी नाहीत का? असा सवाल यावेळी विचारण्यात आला.

कोणीतीही योजना आली की तिचे काम अंगणवाडी सेविकांना दिले जाते, मात्र मागील अनेक महिन्यांपासून मानधन वाढीसाठी आंदोलन सुरु असताना त्याकडे सरकार लक्ष द्यायला तयार नाही अशी तक्रार अंगणवाडी सेविकांनी घेतली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!