Ladki Bahin Yojana 2024 : लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत?? खासदाराच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण…


Ladki Bahin Yojana 2024  : महाराष्ट्रात सध्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देणार आहे.

अशातच आता योजनेविरोधात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, ख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे जनतेची फसवणूक आहे. आता विधानसभा निवडणूक आहे पण दोन महिन्यांनी लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

ते पुढे म्हणाले, महायुती सरकार राज्यावर कर्जाचा डोंगर करेल आणि पळून जाईल. लाडक्या बहीण योजनेसाठी राज्य सरकारच्या तिजोरीतील पैसा वापरला जात आहे. पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आमदारांकडे ठेकेदार आणि जनतेकडून लुटलेले पैसे आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले. Ladki Bahin Yojana 2024

यावेळी त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर आगपाखड केली. दिल्लीत मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. नव्या संसदेतही पाणी शिरले होते. या मुद्द्यावरुन संजय राऊत यांनी भाजपला लक्ष्य केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!