कोल्हापूर हादरलं! एकाच वेळी सहा डान्सर तरुणींचा आत्महत्येचा प्रयत्न, ब्लेडने नसा कापल्या अन…,..

कोल्हापूर : गेल्या काही दिवसापासून कोल्हापूर शहरात गुन्हेगारीच्या वाढत्या घटना समोर येत असतानाच आता सहा डान्सर तरुणींनी एकाच वेळी सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांनी ब्लेडने स्वत:च्या हाताच्या नसा कापून घेतल्या आहेत. सहा तरुणींनी अशाप्रकारे सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या सहा नृत्यांगणांनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न नेमका कोणत्या कारणामुळे केला, याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यापूर्वी सहा तरुणींना पोलिसांनी एका कारवाईदरम्यान ताब्यात घेतलं होतं.या तरुणींना सलग दोन महिने महिला सुधारगृहात राहावे लागल्याने नैराश्य आलं होतं. याच नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.एकाच वेळी सहा तरुणींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने महिला सुधारगृह प्रशासनात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, आत्महत्येचा प्रयत्न करण्यामागच्या कारणांचा शोध पोलीस घेत आहेत. सध्या या सर्व महिलांवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान याआधी पोलिसांनी कोल्हापुरातील कात्यायनी परिसरातील एका फार्महाऊसवर धाड टाकली होती. या फार्महाऊसवर या सहाही तरुणी डान्स पार्टी करताना आढळून आल्या होत्या. त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन महिला सुधारगृहात पाठवलं होतं. आता या सहाही डान्सर तरुणींनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
