Ketaki Chitale : केतकी चितळे मनोज जरांगे पाटलांवर भडकली, म्हणाली, यांना फूट पाडायची आहे सनातनींमध्ये…


Ketaki Chitale : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री केतकी चितळे तिच्या अभिनयापेक्षा वादग्रस्त वक्तव्यामुळे सध्या चर्चेत आहे. केतकी आणि वाद हे एक समीकरण झालं आहे. काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी घरी आलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घातली होती. अशातच आता तिने मनोज जरांगे

केतकी चितळेने मनोज जरांगे यांच्या वक्तव्याचा एक फोटो शेअर केला आहे. यात माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले आहेत,”धनगर आणि मुस्लीम बांधवांनी मागणी केल्यास त्यांच्याही आरक्षणासाठी मी लढा देईल. मग बघतो सरकार कसं त्यांना आरक्षण देत नाही. Ketaki Chitale

मनोज जरांगेंच्या वक्तव्याचा फोटो शेअर करत केतकीने लिहिले आहे, “आता कसे, खरे रुप दिसले. मुखवटा फार काळ टिकत नाही. यांना फूट पाडायची आहे सनातनींमध्ये. आता तरी जागे व्हा”. अशी पोस्ट तिने केली आहे.

दरम्यान, केतकी चितळे काही दिवसांपूर्वी नेटकऱ्यांकडून ट्रोल झाली होती. मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी घरी आलेल्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारत ती म्हणाली होती, तुम्ही मराठा म्हणजे माझ्यावर अ‍ॅट्रॉसिटी टाकणार नाहीत. मी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण आहे.

संविधान आणि कायदा सर्वांसाठी समान नाही. जातींवर आधारित कायदे बनवले जात आहेत. मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे केतकी चांगलीच ट्रोल झाली होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!