Kerala : मोठी बातमी! केरळच्या वायनाडमध्ये भुस्खलन, १९ जणांचा मृत्यू, शेकडो लोकं मातीखाली अडकली…


Kerala : केरळच्या वायनाडमध्ये मंगळवारी पहाटे भूस्खलन झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत १९ जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्याला सुरुवात करण्यात आली आहे.

वायनाड जिल्ह्यातील मेप्पाडी भागात भूस्खलानाची ही घटना घडली आहे. या घटनेत दोन लहान मुलांचाही मृत्यू झाला आहे. तसेच शेकडो लोक या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सध्या केरळमध्ये पावसाने थैमान घातले असून भूस्खलनात घडलेल्या ठिकाणी सुरु असलेल्या पावसामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. मेप्पाडी भागात मंगळवारी रात्री २ वाजताच्या सुमारात भूस्खलानाची पहिली घटना घडली आहे. Kerala

त्यानंतर पुन्हा पहाटे चार वाजताच्या सुमारास आणखी एक भूस्खलन झालं. या घटनेत दोन्हीही भूस्खलानाच्या घटनेत आतापर्यंत समोर आलेल्या वृत्तानुसार १९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच अनेक लोक यामध्ये अडकल्याची शक्यता असून प्रशासनाकडून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.

भूस्खलानाच्या घटनेनंतर अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलच्या तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून युद्धपातळीवर मदतकार्य सुरु करण्यात आलं असल्याची माहिती सांगण्यात आली आहे.

भूस्खलन झालेल्या भागात मदतकार्यासाठी अतिरिक्त एनडीआरएफची टीम देखील दाखल होत असल्याची माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!