आताची सर्वात मोठी बातमी! संतोष देशमुख हत्येच्या मागे कराडचाच हात, सुदर्शन घुलेने केला मोठा गौप्यस्फोट….


बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणी सध्या संपूर्ण राज्य हादरले आहे. तसेच याप्रकरणी विशेष मकोका न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान, सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सखोल युक्तीवाद सादर करत हत्येच्या मागील घटनेचं संपूर्ण तपशील न्यायालयासमोर मांडला.

हत्येचा कट आणि धमकी ६ डिसेंबर २०२४ रोजी सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि सुधीर सांगळे या तिघांनी मस्साजोग येथील आवाजा कंपनीच्या ऑफिसमध्ये घुसून सुरक्षा रक्षकास शिवीगाळ केली आणि मारहाण केली.

यावेळी, सुदर्शन घुलेने कंपनीकडून दोन कोटी रुपयांची मागणी केली आणि पैसे न दिल्यास काम बंद करण्याची धमकी दिली. या वादाच्या सोडवणुकीसाठी सरपंच संतोष देशमुख आणि काही स्थानिक नागरिक घटनास्थळी पोहोचले. मात्र, सुदर्शनने संतोष देशमुख यांनाही धमकावले.

हत्येचा कट हॉटेलमध्ये बैठक ७ डिसेंबरच्या रात्री सुदर्शन घुलेने वाल्मिक कराडला फोन केला आणि घडलेल्या घटनांचा तपशील सांगितला. त्यावर कराडने अडथळा आणणाऱ्यांना संपवा, असं सांगितल्याचा खुलासा झाला. ८ डिसेंबरला रात्री, केजच्या तिरंगा हॉटेलमध्ये सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि एक गोपनीय साक्षीदार एकत्र बसले होते. या बैठकीत संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्येचा कट रचला गेला.

दरम्यान, अपहरण आणि क्रूर हत्या ९ डिसेंबर २०२४ रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे, कॉल डिटेल्स आणि टॉवर लोकेशन्स गोळा केले आहेत, ज्यामुळे ही हत्या ठोस नियोजनाच्या अंतर्गत केल्याचे स्पष्ट होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!