Jodhpur : दुर्दैवी! पाळीव कुत्र्यामुळे बहिण-भावाचा मृत्यू, वाचून उडेल थरकाप, घडलं भयंकर..

Jodhpur : नियतीने ठरविले तर कुठल्याही व्यक्तीच्या किंवा कुटुंबाच्या वाट्याला अपार दुःख येऊ शकते. कधी कधी तर अश्या घटना घडतात की त्या ऐकल्या तरी जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात बसलेल्या व्यक्तीला हळहळ वाटावी.
सध्या अशीच एक धक्कादायक घटना जोधपूरमधून समोर आली आहे. पाळीव कुत्र्यामुळे बहीण भावाला आपला जीव गमवावा लागला आहे. ही घटना जोधपूरच्या माता पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे
अनन्या आणि युवराज सिंग मृत्यू झालेल्या भाऊ-बहीणचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, अनन्या आणि युवराज सिंग हे भाऊ-बहीण होते. दोघेही बनार येथील गणेशपुरा येथील रहिवासी होते. बनार परिसरातील आर्मी चिल्ड्रन ॲकॅडमीमध्ये हे दोघेही पाचवी आणि सातवीच्या वर्गात शिकत होते. Jodhpur
हे दोघेही इतर तीन मित्रांसह शाळेतून परतत होते. वाटेत काही पाळीव कुत्र्यांनी त्यांचा पाठलाग केला. मुले घाबरून पळू लागली. धावत-पळत दोन मुले रेल्वे रुळावर पोहोचली. यादरम्यान अनन्या आणि युवराज यांना मालगाडीने धडक दिली.
यांनतर त्यांच्या मित्रांनी कुटुंबियांना याबाबत माहिती दिली. रेल्वे रुळाजवळ मृतदेह पाहून कुटुंबीयांनी आरडाओरडा सुरू केला. रडल्यामुळे अनन्याचे वडील प्रेम सिंह यांची प्रकृती बिघडली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नातेवाईक व परिसरातील नागरिकांची गर्दी होऊ लागली. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले.