मुलगी झाली हो! सिद्धार्थ-कियारा झाले आई-बाबा, कियारानं दिला गोंडस मुलीला जन्म…

मुंबई : कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ते दोघे आता आई-वडील झाले आहेत. कियारा अडवाणीने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. ही बातमी ऐकून दोघांच्याही घरात आनंदाचं वातावरण आहे. सोशल मीडियावर त्यांचे चाहते सेलिब्रिटी कपलवर शुभेच्छांचा वर्षा करत आहेत.

लग्नानंतर अडीच वर्षांनी दोघेही पालक झाले आहेत. दोघांनी २०२३ मध्ये लग्न केले होते. सिद्धार्थ आणि कियाराची जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये दोघांनीही त्यांच्या सर्व चाहत्यांना दोघेही पालक होण्यासंदर्भातील माहिती दिली होती.
दरम्यान, २८ फेब्रुवारी रोजी आपण गरोदर असल्याचे सांगत कियाराने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये दोघांनीही हातात बाळाचे मोजे धरले होते. फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले, आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट. लवकरच येत आहे. आता तो दिवस आला आहे. कियाराने एका मुलीला जन्म दिला आहे.

सिद्धार्थ आणि कियाराचे लग्न सुमारे अडीच वर्षांपूर्वी झाले होते. दोघांचे लग्न ७ फेब्रुवारी २०२३ रोजी झाले. २०२१ मध्ये ‘शेरशाह’ नावाचा चित्रपट एकत्र प्रदर्शित झाला. असे म्हटले जाते की दोघांची प्रेमकहाणी या चित्रपटाच्या सेटवरून सुरू झाली होती.

या चित्रपटात प्रेषकांना देखील दोघांची जोडी खूप आवडली होती. त्यानंतर २०२३ मध्ये दोघांनी लग्न केले. आता दोघेही एका मुलीचे पालक झाले आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर लोक दोघांचेही अभिनंदन करत आहेत.