धक्कादायक! पहिल्या पत्नीची रिल्स बघणे पडले महागात, दुसऱ्या पत्नीने रागात पतीचा प्रायव्हेट पार्ट…


नवी दिल्ली : पती पत्नीच्या भांडणाच्या अनेक बातम्या येतात. हाणामारी, घर सोडून जाणं हे रोज समोर येत, असे असताना आता एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीने रागात पतीवर हल्ला केल्याचे एक अतिशय धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.

यात आंध्र प्रदेशातील एनटीआर जिल्ह्यात एका महिलेने आपल्या पतीचा प्रायव्हेट पार्ट ब्लेडने कापला. तिने हे भयानक पाऊल उचललं कारण तिचा नवरा त्याच्या पहिल्या पत्नीचे इन्स्टाग्राम रील पाहत होता. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

एक व्यक्ती पाच वर्षांपूर्वी पहिल्या पत्नीपासून विभक्त झाला होता. यानंतर त्याने दुसर लग्न केले आणि पाच महिन्यांपासून तो आपल्या दुसऱ्या पत्नीसोबत मुप्पल्ला परिसरात राहत होता. सगळं काही व्यवस्थित सुरू होत.

असे असताना गेल्या काही दिवसांपासून तो इन्स्टाग्रामवर पहिल्या पत्नीचे रिल्स पाहत होता. हे पाहून दुसरी पत्नी खूप नाराज होती. यावरून दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. यामुळे रोजच खटके उडायला लागले.

एक दिवस महिलेचा संयम सुटला आणि तिने थेट पतीचा प्रायव्हेट पार्ट ब्लेडने कापला. यानंतर पतीची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. याबाबत सध्या पोलीस तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!