हिवाळ्यात त्वचा कोरडी पडतेय? तर घरच्या घरी बनवा नैसर्गिक क्रीम….दुसऱ्या मॉईश्चरायझरची गरजच नाही…


पुणे : हिवाळ्याचा कडाका वाढू लागला आहे आणि त्यासोबतच कोरड्या त्वचेच्या तक्रारींमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. थंड वाऱ्यामुळे आणि कमी आर्द्रतेमुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतोय. त्यामुळे कधी कधी त्वचा कोरडी, निस्तेज आणि कधी कधी खाज सुटते.

विशेषतः चेहरा, हात, पाय आणि ओठ यावर याचा अधिक परिणाम दिसून येतो. बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातही थंडीचा परिणाम जाणवत असून अनेकांना त्वचा फुटण्याची समस्या निर्माण झाली आहे.

दिवसभर केमिकलयुक्त फेसवॉश, मेकअप प्रॉडक्ट्स वापरल्यानंतर चेहर्यावर त्यांचे अवशेष राहतात. यामुळे त्वचा आणखी कोरडी आणि राठ होते. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी चेहरा नीट धुणे आणि योग्य नाइट स्किनकेअर रुटीन फॉलो करणे आवश्यक आहे. या काळात मॉइश्चरायझिंग नाईट क्रीमचा वापर त्वचेला आतून पोषण देतो आणि ओलावा टिकवून ठेवतो.

त्वचा कोरडी पडू नये आणि तिची चमक कायम राहावी यासाठी घरच्या घरी नैसर्गिक नाईट क्रीम तयार करणे सर्वात सुरक्षित आणि फायदेशीर पर्याय आहे. ही क्रीम पूर्णपणे केमिकल-फ्री असून ड्रायनेसवर प्रभावीपणे काम करते. क्रीम बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे – एलोव्हेरा जेल किंवा गर, गुलाबपाणी, बदाम तेल, ग्लिसरीन आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल. हे सर्व घटक त्वचेलाॲन्टीऑक्सिडंट्स आणि हायड्रेशन देतात.

क्रीम तयार करण्यासाठी एका स्वच्छ भांड्यात एलोव्हेराचा गर घ्या. त्यात गुलाबपाणी, 4–5 थेंब बदाम तेल, थोडी ग्लिसरीन आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा अर्क घालून चांगले मिक्स करा. हे मिश्रण एकसारखे झाल्यावर ते एअरटाइट डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवू शकता. ही क्रीम 7–10 दिवस सहज टिकते.

ही नैसर्गिक नाईट क्रीम दररोज रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर हलक्या हाताने लावा. क्रीम त्वचेतील कोरडेपणा दूर करते, सुरकुत्या आणि फाईन लाइन्स कमी करण्यात मदत करते. एलोव्हेरामुळे त्वचा शांत होते आणि गुलाबपाणी तजेला वाढवते. बदाम तेल त्वचेला व्हिटॅमिन ई पुरवते तर ग्लिसरीन त्वचेतील ओलावा लॉक करून ठेवते.

ही क्रीम त्वचेच्या खोलवर जाऊन पेशी दुरुस्त करते, माईश्चरायझिंग लेयर तयार करते आणि हिवाळ्यात होणाऱ्या ड्रायनेसला पूर्णविराम देते. नियमित वापराने त्वचा मऊ, तजेलदार आणि निरोगी दिसू लागते. हिवाळ्यामुळे होणारी खाज, लालसरपणा आणि त्वचा सोलणे यावरही ही क्रीम उपयुक्त ठरते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!