शनिशिंगणापुरात शनिदेवाला आता ब्रँडेड तेलाचा अभिषेक होणार, देवस्थानचा निर्णय; १ मार्चपासून अंमलबजावणी..


अहिल्यानगर : तीर्थक्षेत्र शनिशिंगणापुरात शनिमूर्तीला आता फक्त ब्रॅण्डेड आणि शुद्ध रिफायनरी तेलानेच अभिषेक करता येणार आहे. शनैश्वर देवस्थान आणि ग्रामपंचायत यांनी संयुक्तरीत्या हा निर्णय घेतला असून या निर्णयाची १ मार्चपासून कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

दरम्यान, सुटे व भेसळयुक्त तेलामुळे शनिमूर्तीची भविष्यात होणारी झीज थांबली जाणार असल्याने देवस्थानच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. शनिमहाराजांच्या दर्शनासाठी तीर्थक्षेत्र शनिशिंगणापुरात लाखो भाविक हजेरी लावतात.

शनीची इडा-पीडा टळू दे यासाठी भाविक शनिमूर्तीला तेल वाहतात. महिन्याकाठी वीस हजार लिटर, तर वर्षभरात पाच लाख लिटर तेल शनिमूर्तीवर अर्पण केले जाते. यामध्ये १०० ग्रॅमपासून, पाच ते दहा लिटरपर्यंतच्या तेलाचा समावेश असतो. यामध्ये सर्वाधिक १००, २००, ५०० मिलीलिटरचा पाऊच अथवा बॉटलने शनिमूर्तीवर तेल अर्पण केले जाते.

शनेश्वर देवस्थानने घेतलेल्या निर्णयानुसार फक्त ब्रँडेड आणि शुद्ध रिफायनरी तेलानेच अभिषेक करता येणार आहे. शनेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाच्या बैठकीत १ मार्च २०२५ पासून फक्त ब्रँडेड आणि शुद्ध रिफायनरी खाद्यतेलानेच अभिषेक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

याबाबतची माहिती आणि आदेश मंदिर परिसरात असलेल्या व्यावसायिक, दुकानदारांना बजावले आहे. यानुसार सुटे तेल (नियमबाह्य तेल) वापरण्यास बंदी घालण्यात आली असून, शनिमूर्तीला अर्पण करण्यात येणारे तेल आता शुद्ध रिफायनरी केलेले तसेच अन्न व औषध प्रशासनाचा असलेला एफएसएआय तेल आता शनिमूर्तीवर टाकता येणार आहे. या निर्णयाची १ मार्चपासून कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!