पुण्यात पोलीसच बनला हैवान, महिला पोलिसाला गुंगीचे औषध देऊन केला बलात्कार; ‘तो’ व्हिडिओ व्हायरल करत सतत गैरकृत्य, घटनेने उडाली खळबळ..

पुणे : लॉकडाऊनच्या काळात ओळख वाढून जेवणासाठी घरी येत असताना गुंगीचे औषध देऊन पोलीस शिपायाने महिला पोलीस कर्मचार्यावर बलात्कार केला.
तसेच त्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर सातत्याने बलात्कार करून पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी एका महिला पोलीस कर्मचार्याने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मोघे हा सध्या मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात नेमणूकीला आहे.
दीपक सिताराम मोघे या पोलीस शिपायावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार स्वारगेट पोलीस वसाहत तसेच खडकवासला येथील लॉजवर २०२० ते १ ऑगस्ट २०२३ दरम्यान घडला.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी आणि आरोपी हे दोघेही शहर पोलीस दलात नेमणूकीला असून स्वारगेट पोलीस वसाहतीत राहतात. लॉकडाऊनच्या कालावधीत आरोपी दीपक मोघे याने फिर्यादी महिलेशी ओळख वाढविली. या काळात त्यांच्या घरी जेवणास तो जात होता.
त्या दरम्यान त्याने कोल्ड्रींकमधून फिर्यादीला गुंगीकारक औषध दिले. त्यामुळे फिर्यादीस उलट्यांचा त्रास होऊ लागला. तेव्हा त्याने फिर्यादीला गोळ्या खाण्यास दिल्या.
त्यामुळे आणखी गुंगी येऊन त्यांना झोप लागली. तेव्हा त्याने फिर्यादीसोबत शारीरीक संबंध केले. त्याचा व्हिडिओ तयार केला. हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
तसेच फिर्यादीचे पतीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. फिर्यादीला पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
फिर्यादीच्या घरातील कपाटातील ५ ते ६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, लॅपटॉप, डोंगल व मोबाईल अशा सर्व वस्तू जबरदस्तीने घेऊन गेला. खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलिस निरीक्षक तोटेवार तपास करीत आहेत.