पुणे जिल्ह्यात तीन दिवस पाऊस वाढणार! गारपिट देखील होण्याची शक्यता


 

पुणे : राज्यात मार्च महिन्यानंतर एप्रिल महिन्यात राज्यात अवकाळी पाऊस अन् गारपीट होत आहे. आता पुणे आयएमडीने पुन्हा राज्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस आणि गारपीट होईल, अशी शक्यता व्यक्त केली आहे. यामुळे अजून काही दिवस वातावरण असेच राहील तसेच तापमानात वाढ होणार आहे.

पुणे शहर आणि उपनगरामध्ये तीन दिवस पावसांचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट ऑरेंज दिला आहे. यामुळे काही दिवस महत्वाचे आहेत.

 

दरम्यान, पुणे शहरासह उपनगरांमध्ये तीन दिवस पावसाचा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे. शहरात दिवसभर ऊन तर संध्याकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण असणार आहे. यामुळे अनेकांना आरोग्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

पुणे शहराला हवामान खात्याचा येलो अलर्ट दिली आहे. आज आणि उद्या पुणे शहरात जोरदार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज आहे. पाऊस येणार असला तरी उन्हाळ्यातील वाढत्या तापमानापासून दिलासा मिळणार नाही. तापमान सध्या 40 वर गेले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!