पुण्यात दाजींनी मेहुणीला दोन गोळ्या दिल्या, १८ वर्षीय मेहुणी बेशुद्ध, नको त्या गोष्टी करून अश्लील व्हिडिओही काढले….


पुणे : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

दाजीने मेहुणीला गुंगीचं औषध दिलं. त्यानंतर बेशुद्ध अवस्थेत तिच्यावर बलात्कार केला आणि तिचे फोटो काढल्याची धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे.

ही घटना सुमारे सहा महिन्यांपूर्वी घडली असून, नुकताच हा प्रकार पीडित मुलीने कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर वारजे पोलीस ठाण्यात आरोपी दाजीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, वारजे पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या कुटुंबातील सदस्य नवरात्र निमित्त यात्रेला गेले होते. पीडित मुलीच्या डोकेदुखीच्या तक्रारीवरून तिच्या दाजीने तिला दोन गोळ्या दिल्या. त्या गोळ्या घेतल्यानंतर पीडित मुलगी बेशुद्ध झाली.

दरम्यान, याच संधीचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिचे अश्लील फोटो काढून, जर तू हे कोणाला सांगितलंस तर फोटो व्हायरल करीन, अशी धमकी दिली. या प्रकरणी १८ वर्षीय पीडित मुलीने तिच्या ३६ वर्षीय दाजीविरोधात वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!