संभाजीराजे छत्रपतींवर मोक्का लावून तुरुंगात टाका, प्रकाश आंबेडकरांच्या मागणीने राजकारणात उडाली खळबळ

मुंबई : ‘वाघ्या’ कुत्र्याच्या समाधीचा मुद्यावरून राज्यात सुरू असलेल्या राजकारणावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एक धक्कादायक वक्तव्य केले. संभाजीराजे छत्रपती यांच्यावर मोक्का लावावा अशी मागणी त्यांनी केली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी समोरील वाघ्या कुत्र्याचे शिल्प आहे.
हे शिल्प हटवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे वाघ्या शिल्पाचा वाद चिघळणार का, याची चर्चा सुरू झाली आहे. या सगळ्या घडामोडींवर प्रकाश आंबेडकरांनी हे वक्तव्य केले. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, संभाजी महाराजांना सरळ उचलून मोक्का लावावा. देशाच्या कायद्याच्या विरोधात भुमिका घेण्याऱ्यांचे लांगूलचालन करणे योग्य नाही.
धर्माचे राजकारण करताना जे सोईचे ते वापरतात. संभाजीराजे छत्रपती हे राजर्षी शाहूंचे पणतू आहेत म्हणून त्यांच्या विरोधात भूमिका घ्यायची नाही असे नाही. उद्या मी सुद्धा कायदा विरोधी कृत्य केले तर मला ही तुरुंगात टाकले पाहिजे, असे सांगताना आता ही हिंमत देवेंद्र फडणवीस यांनी दाखवावी, अशी मागणी त्यांनी केली.
त्यांच्या मागणीवर आता अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया पुढे येत आहेत. यावर आता मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलणार हे लवकरच समोर येईल. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी भाजपवर देखील जोरदार निशाणा साधला आहे. ज्या भाजपचे हात मुसलमानांच्या रक्ताने माखले आहेत. त्यांच्याकडून सौगात ए मोदी स्विकारावा का हा विचार मौलवींनी करायला हवा, असेही ते म्हणाले.
हेच मौलवी निवडणुकीच्या वेळी फतवे काढतात ना? मग तुमच्या 18 टक्के समाजाला नाकारणाऱ्यांकडून भेट स्विकारावा का? असा सवालही त्यांनी केला. यामुळे आता राज्यातील राजकीय वाद अजूनच पेटण्याची शक्यता आहे, आता येणाऱ्या काळात काय घडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.